राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अनेक मुद्दे सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे शाब्दिक आखाडा रंगला आहे. जोरदार आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घडलेल्या या प्रकारामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून, विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल, मात्र भाजपा मंत्र्याने स्वत:लाच लोखंडी साखळीनं मारून घेतलं आहे.
https://twitter.com/pithiyanarendra/status/1530035183361343488?s=20&t=0V97uV30HUYKuOA534-Qxg
वाचा नेमकं प्रकरण काय..? सध्या गुजरात भाजपा सरकारमधील मंत्री अरविंद रैयानी यांचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष बाब म्हणजे रैयानी हे सध्या गुजरात सरकारमधील परिवहन, नागरी वाहतूक आणि पर्यटन मंत्री आहेत. तर दुसरीकडे आता ते एका व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंत्री रैयानी स्वत:लाच लोखंडी साखळीनं मारत असल्याचं दिसून येत आहे. तर आजूबाजूचे नागरिक रैयानी यांच्यावर नोटांचा पाऊस पाडत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच कॉंग्रेसने भाजपवर जहरी टीका केली आहे. ‘भाजपा मंत्र्यांवर अंधविश्वासाला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला.
यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं. मात्र त्यावर खुद्द मंत्री रैयानी भाष्य केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना मंत्री रैयानी म्हणाले की, ‘राजकोट इथं वडिलांच्या गावी कुलदैवताच्या मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता. गेल्या १६ वर्षापासून मी या कार्यक्रमात सहभाग घेतोय असं त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. याबाबत बोलताना त्या म्हणतात, मंत्रिपदावर असताना अरविंद रैयानी यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालत लोकांमध्ये अंधविश्वास पसरवली असल्याचा आरोप त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
वडिलांच्या फडणवीसांवरील गंभीर आरोपांनंतर संभाजीराजेंचाही गौप्यस्फोट; म्हणाले, शिवरायांना स्मरून सांगतो…
VIDEO: पार्टीत हॉटनेसचा तडका लावण्यासाठी आली जान्हवी कपूर, पण झाली oops moment ची शिकार
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी बी-ग्रेड चित्रपटात दिले आहेत खुपच बोल्ड सीन्स, यादीत कतरिनाचेही आहे नाव
…त्यामुळे सतीची प्रथा मुस्लिमांच्या अत्याचारामुळे सुरू झाली; मनसेने सांगितला इतिहास