Arvind Kejriwal: दिल्लीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt.) स्थापन झाल्यापासून अनेक नेतेमंडळींनी पक्षांतर केले. यादरम्यान राजकारण पक्षांतराचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवार यांनी एक मोठं वक्तव्य केला आहे.
बुधवारी ( दि. २९) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवाल यांनी दिल्लीच्या संसदेत अनेक मुद्दे उपस्थित केले. दिल्ली विधानसभेत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान केजवाल यांनी अनेक विषयांवर मत मांडले.तर केजरीवाल यांनी ईडीसीबीआयच्या धडींबाबत भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, ईडी आणि सीबीआयने देशातील सर्व भ्रष्टाचारांना एका व्यासपीठावर एकत्र आणलं नाही, तर एका पक्षात एकत्र केला आहे. ईडी आणि सीबीआयवाले छापा टाकतात. त्यानंतर कानावर बंदूक ठेवून तुम्हाला जेलमध्ये जायचं की भाजपात? असे विचारतात.
तसेच, त्याचवेळी मनीषा सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याही कानावर बंदूक ठेवली आणि विचारलं सांगा जेलमध्ये जायचं की भाजपात. पण ते म्हणाले की, जेलमध्ये जायचं. आम्ही मरण पत्करू पण भाजपात जाणार नाही, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
सीबीआईडीच्या भीतीपोटी भाजपात गेलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये अरविंद केजवाल यांनी थेट नारायण राणेंच्या नावाचाही समावेश केला. दुसरीकडे, नारायण राणे (Narayan Rane) यांना हाच प्रश्न विचारल्यावर राणे म्हणाले, भाजपमध्ये जायचं. तपास यंत्रणेची भीती दाखवून भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जात असल्याचा दावा केजवाल यांनी केला आहे.
पुढे बोलताना केजवाल म्हणाले, प्रत्येकाची वेळ बदलते. आज त्यांचा सरकार आहे. मोदी पंतप्रधान आहे. कधी ना कधी ते पायउतार होतीलच ना. त्यावेळी भ्रष्टाचार मुक्त भारत होईल. कसा? देशातील जितके लुटेरे, डाकू, लफंगे, भ्रष्टाचारी आणि चोर आहेत ते सर्व आज भाजपामध्ये आहेत. त्यांना पकडणं फार सोपं आहे. ज्या दिवशी भाजपची सत्ता जाईल. त्यादिवशी भाजपवाल्यांना तुरुंगात टाका. आपला देश भ्रष्टाचार मुक्त होईल.
महत्वाच्या बातम्या –
ठाकरे गटातील आणखी २ खासदार शिंदेगटात जाणार; मोदींच्या जवळच्या मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट
“देशासाठी प्राण हातावर घेऊन लढनारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली किड आहोत का?” पडळकर तुम्हाला माफी नाही
२०२४ च्या निवडणूकांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार? अमित शहा म्हणाले…