Share

“… तर भीमा कोरेगावला जाऊन बघा”; महाराष्ट्राची हास्यजत्राफेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत

Arun Kadam: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हे नाव जरी घेतल तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. या धम्माल कार्यक्रमातील एक चेहरा म्हणजे अभिनेते अरुण कदम. अरुण कदम (Arun Kadam) यांनी त्यांच्या विनोदी शैलीने अनेक प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. तसेच अरुण कदम त्यांच भाष्य देखील अनेकदा चर्चेत येत असते.

अरुण कदम हे आपल्याला विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. ते सोशल मीडियावर (social media) देखील सक्रिय असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नेहमीच त्यांच्या आयुष्यातील घडामोडी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. अरुण कदम यांनी नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

सुरुवातीपासूनच वर्ष भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून बरेच मतभेद होतात. यावरच पोस्ट करताना अरुण कदम यांनी लिहिले की, “विजयस्तंभ भीमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा” तसेच, “तुम्ही शूर वीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा”, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

https://www.instagram.com/p/Cm2EIRcrCNp/?utm_source=ig_web_copy_link

पुढे त्यांनी लिहिले की, “तुमच्या पूर्वजांनी नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की , तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात…” त्याचंवेळी, त्यांनी २४ डिसेंबर १९२७ रोजी महाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देखील दिला आहे.

अरून कदम यांनी केलेली ही इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक नेटकरी या पोस्टवर कमेंट देखील करत आहे. या पोस्टवर कमेंट करताय एक युजरने लिहीले की, अनेक कलाकारांच्या मनात बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजलेले आहेत.

पण ते उघडपणे मत व्यक्त करत नाही. कारण खुप खोलवर रुजलेली जातीव्यवस्था. तसेच त्याने कदम यांचे कौतुक केले. वंचित समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही, असेही अरूण कदम यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने कोरेगावात हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही रविवारी सकाळी विजयस्तंभाला भेट दिली.

यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतिक आहे. या देशात हजारो वर्ष गुलामी होती.राजकीय गुलामी देखील होती.भीमा कोरेगांवच्या लढाईत ही गुलामी संपली. असेही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कदम यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केल आहे. अभिनेते अरुण कदम यांच्या विनोदी भूमिकांचे लाखो चाहते आहेत. कामामध्ये कितीही व्यस्त असले तरी अरुण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतात.

अस्खलित आगरी- कोळी (Agri Koli) भाषा बोलत, व्यासपीठावर येत प्रेक्षकांना निखळ आनंद देणारं एक नाव म्हणजे अरुण कदम (Arun Kadam) यांचं. अभिनय जगतासोबतच एक विनोदवीर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कदम यांनी आपल्या कलेच्या बळावपर प्रेक्षकांना आपलंसं केलं. आता जणू कदम म्हणजे अनेकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग झाले आहेत. सोशल मीडियावर या कुटुंबाची धमाल, पाहत नेटकरी बराच काळ त्यांच्या प्रोफाईलवर वेळ घालवताना दिसतात.

महत्वाच्या बातम्या
Ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने लोकांना लावलं वेड, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
ऋषभ पंतला मृत्यूपासून वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले हे बक्षीस, त्यांनी सांगितली संपूर्ण घटना
लालसिंग चड्ढाच्या धक्क्यामुळे आमिरने बदलला मार्ग, आता केले असे काही की कुणी विचारही केला नव्हता

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now