Share

एकनाथ शिंदेंनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाला दिला शिवसेनेत प्रवेश; दगडी चाळीतील कार्यकर्ते वर्षावर

eknath shinde arun gawali

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटात जोरदार इनकमिंग सुरु आहे. अशात त्यांना चिन्ह आणि शिवसेना नावही मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या आता वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबईच्या भायखाळ्यातील प्रसिद्ध असलेल्या दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश असल्याचे म्हटले जात आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या भावाने देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.

लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्या निवडणूकांमध्ये एकनाथ शिंदेंना या प्रवेशाचा मोठा फायदा होणार आहे. दगडी चाळीतील अरुण गवळी यांचे भाऊ प्रदिप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शनिवारी रात्री उशिरा दगडी चाळीमधील कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी एकचवेळी प्रवेश केल्यामुळे याचा शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे.

सहा-सात महिन्यांपासून बाळासाहेबांच्या विचारांचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. मी सर्वांचे स्वागत करतो. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. या राज्याला पुढे घेऊन जाणारे हे सरकार आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे हे सरकार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच अनेक महत्वाची कामे आहे. कोळीवाडा डेव्हलपेंट आहे. जुन्या इमारतींच्या धोक्यांचा प्रश्न आहे. जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
नृत्यांगना गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
सर्वोच्च न्यायालयात चिन्हासाठी लढत असताना मातोश्रीतील ‘तो’ धनुष्यबाणही गेला, शिवसैनिक हळहळले 
दीड कोटींचा शर्ट चोरण्यासाठी गोल्डमॅनची हत्या, सात वर्षांपूर्वी जीव घेणारे मारेकरी सापडले पण शर्ट…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now