गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. गुन्हेगारीत अनेक धक्कादायक घटनाही समोर येत असतात. अनेकांचा जीव घेतला जातो. सात वर्षांपूर्वी पुण्यात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लोकांच्या वेगवेगळ्या आवडी असतात. काहींना खाण्याची आवड असते, तर काहींना सोन्याच्या दागिन्यांनी. पुण्यातील गोल्डनमॅनला सुद्धा सोन्याची खुप आवड होती. त्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचा शर्ट बनवला होता. पण त्या शर्टामुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पिंपरीत राहणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव दत्ता फुगे असे होते. २०१२ मध्ये त्यांना त्यांच्या शर्टामुळे खुप प्रसिद्ध मिळाली होती. कारण त्यांनी ३.५ किलोचा सोन्याचा शर्ट बनवला होता. त्या शर्टची किंमत तब्बल दीड कोटी रुपये होती. पण त्या शर्टामुळेच त्यांचा जीव गेला आहे.
हा शर्ट जगातील सर्वात महागडा शर्ट होता. गिनीज बुकमध्ये त्याची नोंदही करण्यात आली होती. पुण्यातील रांका ज्वेलर्समधून हा शर्ट बनवण्यात आला होता. त्या शर्टावर १४ हजारांपेक्षा जास्त फुले नक्षीकाम करुन बनवण्यात आली होती. पण इतक्या महागड्या शर्टामुळे त्यांच्या अडचणी सुद्धा वाढल्या.
दत्ता फुगे यांनी वक्रतुंड चिट फंड नावाने कंपनी बनवली होती. त्या कंपनीचे मोठे नुकसान होत होते. त्याच्या संबंधी तक्रारी सुद्धा येत होत्या. त्यामुळे लोक पैसे परत मागू लागले होते. पण नुकसान होत असल्यामुळे त्यांना पैसे परत करणं शक्य होत नव्हते. या सर्व गोष्टीमुळे अतुल मोहिते सुद्धा नाराज होता.
अतुल मोहितेने दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमला जाळ्यात ओढले. अतुलने शुभगमला मित्राच्या पार्टीत बोलवले तसेच सोबत वडिलांना सुद्धा घेऊन यायला सांगितले. त्यांना माहिती होते की, दत्ता फुगे पार्टीत येताना दीड कोटी रुपयांचा शर्ट घालून येतील.
दत्ता फुगे त्या पार्टीत पोहचले होते. पण त्याचवेळी शुभमच्या मित्रांनी दत्ता फुगे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. तेव्हा त्यांची हत्या करणारे अतुल मोहिते आणि रोहन फरार झाले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात ९ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली होती तर चार जण फरार होते.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे दत्ता फुगे यांनी पार्टीमध्ये तो शर्ट परिधान केलाच नव्हता. तसेच घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो शर्ट दुरुस्तीसाठी ज्वेलर्सकडे देण्यात आला होता. पण ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार तो शर्ट त्यांच्यापर्यंत पोहचलाच नाही. त्यामुळे तो शर्ट नक्की कुठे गेला हे अजूनही कोणाला समजलेले नाही.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, मातोश्रीवरील ‘ती’ अनमोल वस्तुही गेली; शिवसैनिक हळहळले
एकनाथ शिंदे आता काय करणार? आदित्य ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत फोडला प्लॅन
आदिल ड्रायव्हर आहे, तो झोपडपट्टीत राहतो; राखीने ढसाढसा रडत सांगीतले नवऱ्याचे सत्य