संजय राऊतांना ईडीची नोटीस आली होती आणि त्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण आता त्यांना धक्क्यावर धक्का बसला आहे. शिवडी कोर्टाने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरोधात शिवडी कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी कोर्टाकडून हा अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. झालं असं होतं की, संजय राऊतांनी काही दिवसांपुर्वी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
हा आरोप करताना त्यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. त्यांनी आरोप केल्यानंतर मेधा सोमय्या कोर्टात गेल्या आणि त्यांनी याचिका दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच सोमय्या यांनी राऊत यांना याप्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा आधीच दिला होता.
त्यानंतर आज राऊतांविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे. मेधा सोमय्या यांनी तक्रार केली होती की, संजय राऊत वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांनी शिवडी कोर्टात अशी तक्रार केली होती. त्यानंंतर शिवडी कोर्टाने त्यांना समन्स बजावलं होतं आणि कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मात्र संजय राऊत हजर राहिले नाहीत. त्यानंतर शिवडी कोर्टाने आता अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले होते की, मीरा भाईंंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाल्याचा आरोप राऊतांनी केला होता.
राऊतांनी असा दावाही केला होता की, मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे खोटी कागदपत्रे दाखल करून फसवणूक करण्यात आली. त्यामधून साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिले घेतल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
वारकऱ्यांच्या विनंतीचा मान राखून उद्धव ठाकरे पंढरपूरला जाणार, म्हणाले, या गदारोळात मी..
रणबीर कपूरबद्दल गुगलवर सर्च केल्या जातात ‘या’ गोष्टी, लोक विचारत आहेत पहिल्या पत्नीबद्दल
भारताचा जगभरात डंका! भारतीय वंशाचा ‘हा’ व्यक्ती होऊ शकतो ब्रिटनचा नवा पंतप्रधान, वाचा त्याच्याबद्दल..
एकीकडे पाठिंबा दुसरीकडे विरोध! मनसेचे शिंदे सरकारला आव्हान, म्हणाले, तुमच्यात हिंमत असेल तर..