Share

‘या’ प्रसिद्ध महिला क्रिकेटरला डेट करतोय अर्जून तेंडूलकर! खासगी फोटो समोर येताच चर्चांना उधाण

भारतीय संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. अर्जून तेंडुलकरने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल २०२३च्या २५व्या सामन्यात पहिली विकेट घेतली. त्यानंतर अर्जून तेंडुलकर प्रचंड चर्चेत आला. सध्या अर्जूनची सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयामुळे चर्चा रंगली आहे. अर्जून तेंडुलकरला प्रेमाची चाहूल लागली आहे का? असा प्रश्न सध्या अर्जूनच्या चाहत्यांमध्ये चर्चा विषय ठरत आहे. अर्जून कधी त्याच्या कामामुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येतो. अर्जून एका महिला क्रिकेटपटूला डेट करत आहे. अर्जून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. अर्जून आणि डॅनियल एका हाॅटेलमध्ये लंचसाठी गेले होते. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांची चर्चा सुरू असुन त्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा पाऊसच पाडत आहेत. याआधी देखील अर्जुन आणि डॅनियल यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. अर्जून तेंडुलकरने भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं. अर्जूनने क्रिकेट विश्वात पाऊल ठेवल्यानंतर घराणेशाहीवरुन त्यांच्यावर निशाण साधण्यात आला आहे. घराणेशाहीवरुन अर्जूनची खिल्ली उडवणार्‍यांना अभिनेत्री प्रिती झिंटा हिने सडेतोड प्रतिउत्तर दिले. तसेच तिने ट्विट करुन अर्जुनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॅनियल वेट बद्दल बोलायचं झालं, तर डॅनियलने आतापर्यंत एकूण ९३ वनडे आणि १२४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. डॅनियल एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाते. तर अर्जुन आणि डॅनियल वेट हे चांगले मित्र आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध अर्जुन तेंडुलकरने शानदार सुरुवात केली. सातव्या षटकात अर्जुनने प्रभसिमरन सिंगला 26 धावांवर बाद केले. पण पंजाबच्या डावाच्या 16व्या षटकात अर्जुन तेंडुलकरने 31 धावा दिल्या. त्यामुळे पंजाब किंग्जला त्यांची धावसंख्या 200 च्या पुढे नेण्यात यश आले. सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीबद्दल बोलताना आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, ‘पंजाबला 10 षटकात 85 धावाही करता आल्या नाहीत. ज्यानंतर हा संघ 160 पर्यंत पोहोचू शकेल का असा प्रश्न होता पण त्यांनी 214 पर्यंत मजल मारली. अर्जुन तेंडुलकरचे एक षटक होते ज्यामध्ये 31 धावा आल्या, त्यानंतर धावांचा वेग पुन्हा बदलला. अर्जुनने एक लज्जास्पद विक्रमही आपल्या नावावर केला. आयपीएलमध्ये प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अर्जुन तेंडुलकरला या मोसमात पदार्पण करण्याची संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने दोन षटकांत १७ धावा दिल्या. दुसऱ्या सामन्यातही अर्जुन सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चमकदार कामगिरी करताना दिसला. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत आयपीएलच्या तीन सामन्यांत दोन बळी घेतले आहेत. अर्जुन तेंडुलकरने पंजाब किंग्जविरुद्ध टाकलेले षटक हे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने टाकलेले दुसरे सर्वात महागडे षटक आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 25 एप्रिलला गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात मुंबईला नक्कीच पुनरागमन करायला आवडेल. महत्वाच्या बातम्या कराडमधील युवकाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी अन् अख्ख्या गावाने सुरू केला राडा; पहा व्हिडीओ  तर मी सुद्धा नावाचा गुलाबराव नाही; ठाकरेंची सभा संपताच गुलाबराव पाटलांनी दिले थेट ‘हे’ आव्हान
ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now