यंदाची इंडियन प्रीमियर लीग २०२२ ही खुपच रोमांचित करणारी आहे, कारण यंदा ८ नाही तर १० संघ खेळत आहे. त्यामुळे यावेळी आयपीएलचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण या आयपीएलमध्ये दोन संघांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातला एक संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि दुसरा संघ चेन्नई सुपर किंग्स. (arjun tendulkar in playing 11)
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची अवस्था खुप वाईट झाली आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ या सिजनमध्ये आतापर्यंत एकही सामना जिंकू शकलेला नाही. मुंबई इंडियन्सने सिजनमधील पहिले पाच सामने सलग गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता मुंबई इंडियन्सच्या संघात काही बदल होईल का नाही? हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक दिग्गज खेळाडू संघासाठी यश मिळवू शकत नसताना पुढील सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. असे झाले तर मुंबई इंडियन्सच्या संघात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळू शकते.
अर्जुन तेंडुलकर २०२१ पासून मध्ये मुंबई इंडियन्ससोबत आहे. मागील सिजनमध्ये मुंबईच्या संघाने त्याला २० लाख रुपये दिले होते, तर या सिजनमध्ये अर्जूनला ३० लाखांमध्ये संघाने विकत घेतले आहे. असे असतानाही अर्जूनला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
बुधवारी मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच संघाला हार पत्करावी लागत असतानाही अर्जुन तेंडुलकरसारख्या तरुणांना संधी का दिली जात नाही? असे अनेक चाहत्यांनी विचारले आहे. त्यामुळे त्याला आता संधी दिली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.
अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाले तर तो २२ वर्षांचा आहे. त्याने आत्तापर्यंत दोन टी २० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकरने तीन धावा करताना दोन विकेट घेतल्या आहेत. अर्जुन तेंडुलकर हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.
मुंबई इंडियन्सने अलीकडेच १८ वर्षीय डेवाल्ड ब्रेविसला संधी दिली आहे. ज्याने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात धूम ठोकली. त्याने अवघ्या २५ चेंडूत ४९ धावा केल्या. अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकरला संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता दिल्ली दंगलीची क्रुरता दाखवणार विवेक अग्निहोत्री? काश्मिर फाईल्सनंतर केली मोठी घोषणा
‘…तर तुम्हाला सोडणार नाही’; मुस्लीम संघटनेची थेट राज ठाकरेंना धमकी, उडाली खळबळ
अंडरवर्ल्ड डॉन अली बुदेशचा मृत्यु, एकेकाळी त्याने दाऊद इब्राहिमला मारण्याची घेतली होती शपथ