Share

supriya sule : बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा, दोन गट आले आमनेसामने; वाचा नेमकं काय प्रकरण?

Supriya-Sule-sad

supriya sule : सध्या राज्याच राजकारण चांगलच तापलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट भाजपचे केंद्रीय मंत्री देखील राज्यात लक्ष घालू लागले आहेत. तर दुसरीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण बारामतीच्या दौऱ्यावर असल्यामुळे चर्चेत आहे. यामुळे आता बारामतीतील राजकारण देखील चांगलच तापलं आहे.

सीतारामन यांच्या दौऱ्याला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गांभीर्याने घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील प्रत्येक गाव पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्याची सुरुवात बारामती तालुक्यातील मळद या गावातून करण्यात आली आहे.

मात्र असं असतानाच एक वेगळी बातमी समोर येतं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे. दोन गट आमनेसामने आले असल्याच बोललं जातं आहे. आज सुळे यांनी बारामती तालुक्यात गावांना भेटी दिल्या. याशिवाय डोर्लेवाडी गावात गावकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्ले वाडी गावातून जातो, गावठाणात रस्ता रुंदीकरण 10 मीटर व्हावं की 7 मीटर यावरून गावकऱ्यांनी थेट सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वाद घातला. अखेर सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केली. अन् वाद मिटवला.

वाद झाल्यानंतर मध्यस्थी करताना सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन गावकऱ्यांना दिलं. सध्या या प्रकरणाची बारामतीच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एक गट म्हणाला सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा. तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली.

महत्त्वाच्या बातम्या
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now