बॉलिवूड असो वा मराठी सिने इंडस्ट्री अनेकदा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागत असतो. अनेकदा अभिनेत्री याबाबत खुलासाही करताना दिसून येतात. अशातच एका मराठी अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने कास्टिंग काऊचबद्दलचा एक अनुभव सांगितला आहे. (archana nevarekar talking about casting cauch)
प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने याबाबत मोठा खुलासा केला आहे. अर्चना नेवरेकर ही मराठीची प्रसिद्धी अभिनेत्री आहे, तसेच तिने अनेक नाटकेही केली आहे. तिने आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तिथे आलेल्या वाईट अनुभवाबद्दल तिने सांगितले आहे.
अर्चना ही सुप्रिया पाठारे यांची धाकटी बहिण आहे. त्यांनी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अर्चनाचे वडील मानसिकदृष्ट्या त्रासले होते. त्यामुळे त्यांचे निधन झाले होते. जेव्हा अर्चना चार-पाच वर्षांची होती, तेव्हाच तिने एका नाटकात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
तिथूनच अर्चनाचा नाटकातील प्रवास सुरु झाला. ती फुलराणी, जन्मदाता, स्वप्न सौभाग्याचे, सुना येती घरा, वहिनीची माया, अशा नाटकांमधून चित्रपटातून अर्चनाने खुप प्रसिद्धी मिळाली. मराठीतून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिथे तिच्यासोबत एक भयानक घटना घडली. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला.
मी मराठी इंडस्ट्रीत खुप स्थिरावले होते, सगळी चांगली माणसं मला भेटत गेली. त्यामुळे चांगली कामे मला मिळाली. अशात एका हिंदी चित्रपटात माझं सिलेक्शन झालं होतं. मी नाव नाही घेत पण खुप मोठा चित्रपट होता. त्याच्यामध्ये दोन मुलींचे सिलेक्शन झाले, त्यात मी काम करणार होते, असे अर्चनाने म्हटले आहे.
त्यावेळी सिनेमा करण्यासाठी त्यांनी माझ्यासमोर एक ठेवली होती. आम्ही तुमच्या सिरियल्स बघितल्या, तुमचं काम चांगलं आहे. तुमचे फोटो पण चांगले आहे. पण तुला जर या सिनेमात काम करायचं असेल तर तुला या चार लोकांसोबत चार दिवस राहावं लागेल, अशी अट त्यांनी ठेवली होती, असा भयानक अनुभन अर्चनाने सांगितला आहे.
तसेच त्यावेळी मी तिथे काम करण्यास नकार दिला. पण त्या चित्रपटात जी मुलगी सिलेक्ट झाली, आजच्या घडीला ती टॉपला आहे. मी तिला बघून खुप शॉक झाले होते, कारण ती आपल्याच बॅचची मुलगी होती. या अडचणींना मी आणि सुप्रिया सामोरे गेला आहोत, पण अशा गोष्टींमध्ये सुप्रिया कोणाच्या थोबाडीत द्यायला सुद्धा घाबरायची नाही, असे अर्चनाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठे देशभक्त आहे रतन टाटा, भारतातील शास्त्रज्ञांसाठी वाचवला ‘हा’ स्टार्टअप; प्रसिद्ध उद्योगपतीने सांगितला किस्सा
ही आहे जगातील सगळ्यात स्ट्रॉंग बिअर, महागड्या दारूची नशाची पडेल फिकी, एक घोट घेतला तरी..
गौतम अदानी आणि प्रिती अदानींना पवारांच्या घरी पाहून सगळेच झाले हैराण; सुप्रिया सुळे म्हणाल्या…