रणवीर सिंग हा असा अभिनेता आहे, ज्याने खुप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा बनवली आहे. रणवीरचा पहिला चित्रपट बँड बाजा बारात हा होता, ज्यामध्ये अनुष्का शर्मा त्याची नायिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
मनीष शर्मा दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटातील रणवीर आणि अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटात दोघांमध्ये एक सेक्स सीनही शुट करण्यात आला होता आणि याचदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्याही मीडियात आल्या होत्या.
एका मुलाखतीत रणवीरने चित्रपटातील सेक्स सीन आणि त्याच्या बॉलिवूडपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. त्याच्यासोबत चित्रपटात काम करणाऱ्या अनुष्काबाबत रणवीर म्हणाला होता की, मला वाटतं, अनुष्का माझ्यापेक्षा चांगली कलकार आहे.
तसेच रणवीरने यावेळी चित्रपटातील त्यांच्या सेक्स सीनवरही प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन करू शकतो, कारण ती खूप सहाय्यक सह-अभिनेत्री आहे. रणवीर सिंगच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोलही केले होते.
रणवीरने मुलाखतीत त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. त्यानुसार २०११ मध्ये तो आर्थिक अडचणीत आला होता. तो म्हणाला की, मी वर्कआऊट करायला सुरुवात केली. मी १० महिने थिएटर केले. मला ऑफर्स येऊ लागल्या. यादरम्यान मी अनेक बड्या निर्मात्यांच्या ऑफर्स नाकारल्या आणि माझ्या ड्रीम प्रोजेक्टची वाट पाहिली. संघर्षादरम्यान त्याला कास्टिंग काउचला सामोरे जावे लागल्याचेही रणवीरने यावेळी सांगितले होते.
रणवीर म्हणतो, संघर्षाच्या काळात गोष्टी खूप वाईट झाल्या. माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. रणवीरच्या म्हणण्यानुसार, नंतर त्याला यशराज फिल्म्सचा बँड बाजा बारात हा चित्रपट मिळाला आणि जीवनाची गाडी पुन्हा रुळावर आली.
दरम्यान, रणवीर किंवा अनुष्का या दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या बातम्यांवर कोणताही शिक्का मारला नव्हता. एका मीडिया हाऊसने अनुष्काला तिची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ती भडकली होती. तिने सांगितले होते की रणवीरसोबतच्या नात्याबद्दल तिला चांगलेच माहिती आहे आणि मीडिया याबद्दल काय लिहितो याची तिला पर्वा नाही.
तसेच ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये अनुष्का म्हणाली होती, तुम्हाला माहिती आहे का मी रणवीरला डेट का केले नाही? कारण तो एक घाणेरडा मुलगा आहे. रणवीर सिंगने दीपिका पदुकोणशी तर अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न केले आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुसेवालाची हत्या करणारे शुटर पुण्यातले सराईत गुन्हेगार, एकाने १६ व्या वर्षीच केलाय सरपंचाचा हाफमर्डर
सोनाक्षी सिन्हा पडलीये झहीर इक्बालच्या प्रेमात, पोस्टवर कमेंट करत म्हणाली, लव्ह यू… ; जाणून घ्या कोण आहे तो…
सिद्धू मुसेवालाच्या आठवनीत नायजेरियन रॅपरने केले असे काही की…; किस्सा वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल