Share

अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ३ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटातून करणार पुनरागमन

दीर्घकाळापासून अभिनयापासून लांब असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच रूपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. अनुष्का ३ वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्यासाठी उत्सुक आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाद्वारे अनुष्का अभिनय क्षेत्रात परतत आहे. यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे तिने माहिती दिली आहे.

अनुष्काने गुरुवारी तिच्या ट्विटर हँडलवर तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार झूलन गोस्वामी यांच्यावर आधारित आहे. चित्रपटात अनुष्काने झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारली आहे. अनुष्काने शेअर केलेल्या टीझरमध्ये दिसत आहे की, ती हातात बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे.

https://twitter.com/AnushkaSharma/status/1478940165418610688?s=20

अनुष्काला क्रिकेटरच्या रूपात पाहून तिचे चाहते खूपच खूश आहेत. तर दुसरीकडे मात्र, तिला काही नेटकरी ट्रोल करत आहेत. टीझर पाहून अनेकजण अनुष्का शर्माच्या लूक, रंग आणि भाषा यावरून अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अनुष्काने शेअर केलेल्या या टीझरवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

‘चकदा एक्सप्रेस’मधील अनुष्काच्या लूकवर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘ती काही अंशीसुद्धा झूलन गोस्वामीसारखी दिसत नाहिये. ना तिची उंची आणि नाही तिचा रंग. तसेच तिची बंगाली भाषासुद्धा विचित्रच वाटतंय’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘ती भाषेचा उच्चार कसा करतीये? झूलन अजिबात त्याप्रकारे बोलत नाही.’

https://twitter.com/sanghiii_/status/1478999786246180864?s=20

दरम्यान, झूलन गोस्वामी या एक बंगाली क्रिकेटर आहेत. त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार राहिल्या आहेत. ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात चकदा शहरापासून ते राष्ट्रीय संघासाठी खेळण्यापर्यंतचा झूलन यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

अनुष्का शर्माबाबत बोलायचे झाल्यास २०१८ साली आलेल्या ‘झिरो’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. यामध्ये अनुष्कासोबत शाहरूख खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

नोकरी सोडा आणि २५ हजारात सुरू करा हा व्यवसाय, दहमहा कमवा ३ लाख, सरकारही देतंय ५०% अनुदान
पब्लिक हॉलिडे घेणे कायदेशीर अधिकार नाही, सुट्टी कमी करण्याची वेळ आली आहे, न्यायालयाचा निकाल
‘या’ ठिकाणी फक्त १५ लाखात मिळत आहे JAGUAR कार, वाचा कारची संपुर्ण डिटेल्स

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now