राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारवर विरोधक आक्रमक झाले असून ते सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या नवावर सरकार बेवड्यांचं भलं करत आहे, असा आरोप सातत्याने होतोय. राज्य सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या निर्णयाविरोधात बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही हजारे यांनी पत्रात दिला आहे.
तसेच शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?, असा सवाल अण्णांनी केला आहे.
दरम्यान, ‘वाईन विक्री’च्या निर्णयाविरोधात बोलताना हजारे म्हणाले, सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलन केले जाईल. राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी शासनाने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.’
दरम्यान, राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा सध्या विरोधक विरोध करत आहेत. त्यातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. हे राज्य शिवछत्रपतींचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, इथे वाईन विक्री सारखे निर्णय खपवून घेतले जाणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
वाईन विकून महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा हा घाट असल्याचं सांगत वाईनरी उद्योगाने जर शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर मग त्यांना चरस गांजाची देखील शेती करण्याची परवानगी द्या अशी मागणी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रात्री उशिरा घरी परतली महिला, सकाळी गाडीची डिक्की उघडून बघितली तर बसला धक्का; पहा व्हिडिओ
पोस्टाने घरी आलेले पाकीट उघडले आणि महिलेची झाली फसवणूक, पैशांचा लोभ पडला महागात
आता करोडपती झाले आहेत योगी आदित्यनाथ, वाचा मुख्यमंत्री बनल्यानंतर किती पटीने वाढली त्यांची संपत्ती
पुण्यात जबर राडा..! शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर, व्हिडिओ तूफान व्हायरल