Share

वाईन विक्रीबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंनी थोपटले दंड; उपोषणाची केली घोषणा

anna hazare

राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारवर विरोधक आक्रमक झाले असून ते सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर संताप व्यक्त करत याविरोधात येत्या 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला त्यांनी दिला आहे.

14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण करणार आहे. हजारे यांनी यासंदर्भात याआधी देखील राज्य सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात पत्रच अण्णा हजारेंनी राज्य सरकारला पाठवलं होतं. या निर्णयाविरोधात बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही हजारे यांनी पत्रात दिला दिला होता.

तसेच राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते, असल्याचे हजारे म्हणाले.

युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे म्हणालेत. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो. महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?, असा सवाल अण्णांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
चीनमध्ये बनवला आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, 1600 तुकडे करून आणला भारतात, किंमत वाचून अवाक व्हाल
कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात; मुंबई, मालेगावात मुस्लिम तरुण-तरुणी रस्त्यावर
सर्वांना आशिकी शिकवणाऱ्या अभिनेत्याची प्रेमामुळेच झालीये आज अशी अवस्था, नशिबाने नाही दिली साथ
अल्लू अर्जुनचा चित्रपट बकवास, मनोरंजनाच्या नावाखाली मुर्खपणा; पद्मश्री गरिकापती नरसिंह निर्मात्यांवर संतापले

इतर मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now