भाजप महाविकास आघाडीवर वेगवेगळ्या मुद्यावरुन आक्रमक होताना दिसत आहे. असे असताना आता अण्णा हजारे महाविकास आघाडी सरकारवर आक्रमक झाले आहे. लोकायुक्त कायद्याच्या मुद्यावरुन अण्णा हजारे राज्य सरकारवर आक्रमक झाले आहे. (anna hajare on thackeray government)
कायदा करा, अन्यथा सरकारमधून पाय उतार व्हा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच हा कायदा न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाल्याची माहितीही अण्णा हजारे यांनी दिली आहे.
लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकायुक्त कायदा बनवण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच झालेले नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यासही तयार नाही, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. अण्णा हजारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांच्याशी बोलताना हजारेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
सरकारच्या या उदासिनतेविरोधात पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यात सत्ता आहे. पण त्या राज्यात लोकायुक्त कायदा तयार करण्यात आलेला नाही. याचे दु:ख वाटत आहे, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. आता आता राज्य सरकार याची दखल घेईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुमच्या मालकांसह १७ पिढ्या खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील; उद्धव ठाकरे गरजले
‘केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद अन् उच्छादाचा कळस करतात, त्यांना ठेचायची वेळ आलीय’
शिवसेनेच्या विराट सभेतील ‘हा’ क्षण ठरला लक्षणीय; वाचा नेमकं काय घडलं…