राज्याच्या राजकारणामध्ये राणे कुटुंब हे नेहमीच चर्चेचा विषय असते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि भाजप नेते निलेश राणे हेही चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद झालेला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा असेच काहीसे झाले आहे. (anjali damania angry on rane family)
निलेश राणे यांनी नुकतंच मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना धारेवर धरलं होतं.आता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे, असे ते म्हणाले होते. आता त्यांच्या वर्तवणूकीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे राणे कुटुंब स्वत:ला समजता काय? अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राणे कुटुंबावर निशाणा साधला आहे. राणे कुटुंबियांच्या वागणूकीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे यांची भाषा आणि त्यांची वागण्याची पद्धत याच्यावर वारंवार चर्चा होत असते. निलेश राणे कोणत्या हक्काने तिथे गेले होते. सध्या ते सामान्य नागरिक असून त्याप्रमाणे त्यांना वागलं पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
प्रत्येक अधिकाऱ्याला मान सन्मान दिला पाहिजे. आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो, पण त्याची एक पद्धत असते. आम्हीदेखील अनेक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो. पण कुठे बसतो, बोलतो याचं भान ठेवायला हवं, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
तसेच ही काय भाषा आहे, हे स्वत:ला समजतात काय? सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्याविरोधात लगेचच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या तिघांनाही शिस्त लावण्याची खुप गरज आहे. याआधीही त्यांनी एका अभियंत्याला चिखलाने माखलं होतं ही गुंडागिरी काही नवीन नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुम्हीही वापरताय Hey WhatsApp? चुकूनही वापरू नका नाहीतर पडेल महागात, कंपनीने दिला इशारा
मंत्रिपद मिळवण्यासाठी बंडखोर आमदारांमध्ये रस्सीखेच, १२ लक्झरी बस घेऊन मुंबईला रवाना
सारा अली खानसोबत गोवा ट्रिपला गेल्यानंतर काय काय झालं? जान्हवी कपूरने उघड केले रहस्य