शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांचा सांगितीक प्रवास उलगडून सांगणारा मी वसंतराव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. राहुल देशपांडे यांनी ही भूमिका समर्थपणे साकारली आहे. तसेच अनिता दाते, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. पण तुम्हाला माहितीये का अनिताने या आधीही अनेक चित्रपटांत महत्वाची भूमिका साकारली आहे. जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल…
सनई चौघडे- हा व्यावसायिकदृष्ट्या अनिताचा पहिलाच चित्रपट होता. मल्टीस्टारर चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, सई ताम्हणकर, दीप्ती केतकर , संतोष जुवेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात अनिताने गावाकडच्या लग्नाळू मुलीची भूमिका केली होती.
जोगवा- भंडार भोग आणि चौंडक या राजन गवस लिखित कादंबरीवर आधारित राजीव पाटील दिग्दर्शित सिनेमामध्ये मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटामध्ये अनिता दातेने सखूची भूमिका साकारली होती.
अय्या – राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असलेल्या हिंदी चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकले होते. सुबोध भावे, सतिश आळेकर, निर्मिती सावंत, अमेय वाघ, ज्योती सुभाष यांच्यासह अनिता दाते ही लेडी गागाच्या भूमिकेत होती.
अ पेईंग घोस्ट – २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात स्पृहा जोशी, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि शर्वाणी पिल्लई यांच्या मुख्य भूमिका होत्या, अनिता दातेने या चित्रपटात वृंदाची भूमिका साकारली होती.
अनिताने चित्रपटासह माझ्या नवर्याची बायको, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतही काम केले आहे. तसेच अडगुलं मडगुलं, जस्ट हलकं फ़ुलकं या व्यावसायिक नाटकातही काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलेंडरचा भडका, तब्बल एवढ्या रुपयांनी महागला सिलेंडर
सामंथा रुथ प्रभूच्या बोल्ड स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, फोटो पाहून काळजाचा ठोका चुकेल
धक्कादायक! गरोदर बकरीवर बलात्कार करून केले ‘हे’ भयानक कृत्य, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक