Share

आता शरद पवारांवर टीका नको, नाहीतर…; राष्ट्रवादी काँग्रेसची थेट राज ठाकरेंना धमकी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यावरुन राज ठाकरेंवर राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. (anita bhamre criticize raj thackeray)

गुढीपाडव्याच्या त्या सभेनंतर राज ठाकरेंनी टीकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारमधील नेत्यांवर टीका केल्या. तसेच उत्तर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती.

आपल्याकडे हजारो वर्षांपासून जाती आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले गेले, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच शरद पवार हे नास्तिक आहे. ते देव मानत नाहीत, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. आता त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तर देताना दिसून येत आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरेंना इशाराही दिला आहे. शरद पवारांवर टीका करु नका, नाहीतर राष्ट्रवादीच्या महिलांना हातातल्या बांगड्या काढायला वेळ लागणार नाही, असे अनिता भामरे यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांपासून संपूर्ण देशाला कोरोनासारख्या रोगाने कवेत घेतले होते. आता कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे महाराष्ट्रात आनंदात साजरा करत असताना मनसे नेते राज ठाकरे यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. निवडणूका जवळ आल्या की विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी पोटशुळ उठतो, असेही अनिता भामरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे आता सर्व सामान्य जनता फक्त विकासाला मानते. आम्हीही हिंदू आहोत म्हणून इतर धर्मांचा नाहक विरोध करत नाही. आपण धर्माभिमानी आहात म्हणून कृपा करुन आमच्या स्वाभिमानी नेतृत्वावर टीका नको नाहीतर राष्ट्रवादीच्या महिलांना हातातल्या बांगड्या काढायला वेळ लागणार नाही, असेही अनिता भामरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

धोनीमुळे मला प्रेरणा मिळते कारण..; KGF फेम यशच्या वक्तव्याचं होतंय कौतुक, मानतो धोनीला आदर्श

बाकीचे १० जण काय लस्सी प्यायला गेले होते का? विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी संतापला

मनसे विरूद्ध राष्ट्रवादी वाद चिघळला, शरद पवारांचे तोंड म्हशीच्या.., मनसेने पुन्हा राष्ट्रवादीला डिवचलं

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now