मनी लाँड्रिंग प्रकरणात आठ तासांच्या चौकशीनंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी मनी लाँड्रिंग प्रकरणात संबंध असल्याचे सांगत ईडीने ही कारवाई केली आहे.
मुख्य म्हणजे मलिक यांच्या अटकेनंतर भाजपा नेत किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना, “अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार,” असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्यांच्या या वक्तव्यानंतर तिसरा नंबर अनिल परब यांचा असेल का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज सकाळी जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक झाली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी पहिली प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. त्याचबरोबर “जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलीयों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंक्लाब के नारो से…” असे ट्विट नवाब मलिक यांच्या कार्यालयातुन करण्यात आले.
दरम्यान मलिक यांच्या अटकेची बातमी पसरताच ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी त्यांनी आंदोलन करत मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदविला. तसेच घोषणाबाजी करत भाजपवर जोरदार टीका केली. सध्या नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
त्यांना पुढील २४ तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याकाळात मलिक यांच्या सुटकेचे प्रयत्न करण्यात येतील. परंतु जर मलिक यांना जामिन मिळाला नाही तर त्याच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी धरला भारतीयाचा हात, दलीप सिंग यांना सोपवली मोठी जबाबदारी
शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना: आता तुमचे पैसै होणार दुप्पट, वाचा कसा घ्यायचा लाभ
करेक्ट कार्यक्रम! नोकरीचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला मनसेकडून चोप, पहा व्हिडीओ
ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून आमदार, खासदारकीचे बक्षिस; पवारांनी पुराव्यासहित उघडं पाडलं पितळ