Share

एसटी कर्मचाऱ्यांचा ३१ मार्चचा अल्टिमेटम संपला, संपकऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले…

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा, अशी मागणी करत ते संप करत आहे. राज्य सरकार वारंवार आवाहन करुन आणि अल्टिमेटम देऊनही ते संपावर ठाम आहे. (anil parab in action mode)

राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. आता तो अल्टिमेटम संपला असून अजूनही कर्मचारी कामावर परतले नाही. त्यामुळे आता परीवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर राहण्याचं वारंवार आवाहन केलं आहे. आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना सातवेळा परतण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यावरील कारवाया मागे घेण्याचंही म्हटलं आहे. पण असा समज झालाय की प्रशासन फक्त सांगत आहे काही करत नाही. त्यामुळे जेवढे उपलब्ध कर्मचारी आहे, त्यांना घेऊन आम्ही एसटी सेवा सुरु करत आहोत, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

तसेच आम्ही ११ हजार कंत्राटी चालक, वाहक यांची नेमणूक करण्यासाठी टेंडर तयार करत आहोत. एसटीचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. एसटीची सेवा ग्रामीण भागात चालते. जवळपास १२ हजार फेऱ्या चालतात, त्यापैकी अधिकाधिक फेऱ्या नव्या रचनेत कशा होतील याबाबतही आमची तयारी सुरु आहे, असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम संपलेला आहे. त्यानंतर आता पुढे काय करणार त्यावरही अनिल परब यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, जे कर्मचारी कामावर येणार नाही, त्यांच्याबद्दल आता आमचं असं मत आहे की त्यांना नोकरीची गरज नाही.

जे १ एप्रिलपासून कामावर येणार नाही, त्यांच्याबद्दल आमचं आता असं मत झालं आहे की त्यांना नोकरीची गरज नाही. त्याचं कारण असं की, वारंवार सांगूनही कुठलंही कारण न देता कर्मचारी गैरहजर आहेत आणि त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आम्ही त्यांच्याविरोधातील जी कारवाई थांबवली होती, ती कारवाई सुरु करणार आहोत, असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
सिल्क स्मितासह ‘या’ 10 बी-ग्रेड साऊथच्या अभिनेत्रींनी ओलांडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, पहा फोटो
महागाईच्या प्रश्नावर भडकले बाबा रामदेव; म्हणाले, काय करायचंय ते करून घे, शांत राहा, नाहीतर..
राजामौलींच्या RRR चित्रपटाशी संबंधित पोस्ट डिलीट का केल्या? आलिया भट्टने केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now