जगभरातील शास्त्रज्ञ ग्लोबल वॉर्मिंगबाबत सतत इशारे देत आहेत, तरीही बहुतांश लोक याला गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. पृथ्वीच्या स्थितीवर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अनेक देश हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या विचाराने उत्तराखंडच्या एका माजी सरकारी अधिकाऱ्याने चक्क एक जंगलच उभारले आहे. (anil joshi jungle)
सामान्य सुपीक जमिनीचे जंगलात रूपांतर केले आहे. ही जमीन इतकी भरभराटीला आली की भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले आहे. पण प्रत्यक्षात या जमिनीची किंमत रेल्वे प्रकल्पासाठी मोजली असता रेल्वे अधिकाऱ्यांना घामच फुटला आहे
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गावर १० लाख रोपे लावून जंगल उभारणारे अनिल जोशी सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळे नवीन लाईन टाकण्यासाठी जर रेल्वेला ते कापावे लागले तर ४०० कोटींची भरपाई द्यावी लागणार आहे. वैयक्तिकरित्या, ही कदाचित संपूर्ण देशातील सर्वात मोठी नुकसानभरपाईची रक्कम असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणादरम्यान मथेलामध्ये एक मोठे रेल्वे स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला होता. माजी सरकारी अधिकारी अनिल किशोर जोशी यांची याठिकाणी येते. ज्याने ३४ लोकांची सुपीक जमीन करारानुसार घेतली होती. त्याने तिथे सात लाख तुती आणि तीन लाख इतर फळझाडे लावली.
हे जंगल वसवणारे अनिल जोशी आणि त्यांचे मित्र आणि नातेवाईक याला परिसरातील पहिले मानवनिर्मित जंगल म्हणतात. प्रत्यक्षात मोजणी केल्यानंतर जोशींच्या जंगलात ७ लाखांहून अधिक तुतीची झाडे आहेत आणि उर्वरित ३ लाखांमध्ये काही संत्रा, आंबा आणि इतर फळझाडे आहेत.
नियमानुसार जमीन मालकालाच मोबदला मिळतो. नियमांनुसार एका फळझाडाची, विशेषत: संत्र्याच्या झाडाची किंमत २१९६ रुपये आहे, अशा प्रकारे त्यांच्या बागेची भरपाई ४०० कोटी रुपये आहे. रेल्वेने तुतीला फळझाड न मानल्याने आणि त्यासाठी प्रति झाड साडेचार रुपये आकारल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे.
याप्रकरणी जोशी उच्च न्यायालयात पोहोचले आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी उद्यान विभागाला तुतीचे झाड फळदायी मानले जाऊ शकते का? अशी विचारणा केली असता विभागाने ते फळझाड मानले आहे. म्हणजेच, त्याची भरपाई देखील उर्वरित फळझाडांच्या बरोबरीची असेल. सध्या हे प्रकरण न्यायाधिकरणात आहे ज्यात अद्याप न्यायाधीशाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे प्रकरण अडकलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
दारूच्या नशेत धुंद होती अभिनेत्री, पोलिसांना केली शिवीगाळ, चालत्या व्यक्तीवर चढवली गाडी
‘गळाभेट घेत-बिर्याणी खायला गेल्याने…,’ मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीने पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य, उचललं टोकाचं पाऊल