Share

अनिल देशमुखांच्या १०० कोटी वसुली प्रकरणला वेगळं वळण, देशमुखांना मिळणार क्लीन चीट

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणामुळे त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. असे असतानाच आता या प्रकरणाला वेगळे वळण लागताना दिसून येत आहे. (anil deshmu in 100 cr case)

आता चांदिवाला आयोगाचे कामकाज पूर्ण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासात सचिन वाझे आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही. त्यामुळे लवकरच अनिल देशमुखांना क्लीन चीट मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती.या आयोगाचे कामकाज पूर्ण झाले आहे. २३ मार्चला सीलबंद अहवाल तयार होणार आहे.

आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी एक युक्तिवाद केला आहे. १०० कोटी वसुलीची गंभीर घटना दोघांनीही स्टेशन डायरीत नोंदवली नाही. स्टेशन डायरी हे पोलिसांसाठी महत्वाचे साधन आहे. पण त्यांनी याचा वापर केला नाही. सचिन वाझेने १०० कोटी वसुलीबाबत वरिष्ठांकडे कधीच लेखी तक्रार केली नाही, असा युक्तिवाद हिरे यांनी केला आहे.

तसेच परमबीर सिंग यांनी २० मार्च २०२१ च्या आधीपर्यंत कधीच १०० कोटी वसुली प्रकरणी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली नाही. १०० कोटी वसुली प्रकरण हे २० मार्चपूर्वीपासून सुरु होते, त्याची कुठेही एफआयआर नाही, असेही हिरे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता अनिल देशमुखांना क्लीन चीट मिळण्याची दाट शक्यता आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे आरोप वैध नाही. तसेच १०० कोटी वसुलीचे कुठेही आरोपाची नोंद नसल्याने अनिल देशमुखांना आता दिलासा मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मी चित्रपट पाहिला नाही पण..,’ ‘द काश्मीर फाइल्स’वर नाना पाटेकरांचं मोठं विधान
चांगली बातमी! नाशिक फाटा ते राजगुरूनगर अंतर अवघ्या २० मिनीटांत होणार पुर्ण
“काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील घुसखोरी आणि हल्ले कमी झाले”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now