माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडले आहे. त्यांच्यावर ईडी कारवाई करत असून त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षीच त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी तो राजीनामा का दिला होता? याबाबत खुलासा झाला आहे. (anil deshmukh homeminister resign)
अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात आपल्या गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. कथित १०० कोटींच्या वसूली प्रकरणी देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला होता.
अनिल देशमुख म्हणाले की, २० मार्च २०२१ रोजी परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप करणारे एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पत्राच्या आधारे ऍड. जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने ५ एप्रिल २०२१ रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला होता.
दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती मुंकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळली होती. त्या प्रकरणी तत्कालीन मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी राज्य सरकारची दिशाभूल करत खोटी माहिती दिली होती, असेही अनिल देशमुखांनी म्हटले आहे.
५ मार्च २०२१ रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होते. त्यावेळी माहिती करुन घेण्यासाठी परमबीर सिंह यांना विधानसभेत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मी गृहमंत्री होतो. त्यावेळी माझ्यासह अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि इतर वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित होते. तेव्हा परमबीर यांनी मनसुख हत्या आणि अँटिलिया प्रकरणी परमबीर सिंह जी माहिती देत होती, ती दिशाभूल करणारी होती, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
तसेच ब्रिफींगदरम्यान पोलीस आयुक्त कार्यलयाच्या इनोव्हा कारचा वापर सचिन वाझेने केला होता. या ब्रिफींगनंतर काही दिवसांत एनआयएने तपास आपल्या हाती घेतला आणि मार्च १३ २०२१ रोजी वाझेला अटक करण्यात आली. तेव्हाच परमबीर सिंह हे या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे मला समजले होते, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुनील ग्रोव्हरची झाली हार्ट सर्जरी, चाहते करत आहेत त्याच्यासाठी प्रार्थना; डॉक्टर म्हणाले..
भाजपाला धक्का! मोदींच्या निकटवर्तीय माजी मंत्र्याने घेतला राजकारणातून संन्यास
काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी पालिकेत येऊ द्या की; राज ठाकरेंचा नवा लुक व्हायरल