अमेरिकेच्या क्वीन्स शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला सेक्स वर्कर सेक्स करण्याचे सांगत ग्राहकांना घातक औषधांचा डोस द्यायची आणि त्यांचे पैसे पळवून न्यायची, अशी माहिती प्रकार समोर आला आहे. यामध्ये चार लोकांचा मृत्यु झाल्यामुळे आता कोर्टाने तिला तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. (angelina barini kill their customers)
त्या सेक्स वर्कर महिलेने तिच्या ग्राहकांना घातक औषधांचा ओव्हरडोज दिला होता. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात न्यायालयाने तिला ३० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात, फिर्यादींनी सांगितले की, महिलेने तिच्या ग्राहकांना लुटण्यासाठी त्यांच्यावर घातक औषधांचा वापर केला होता.
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, या ४३ वर्षीय महिलेचे नाव अँजेलिना बारिनी आहे आणि ती अमेरिकेतील क्वीन्सची आहे. २०१९ मध्ये चार पुरुषांना जीवघेणा अंमली पदार्थ देऊन जीव घेतल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने तिला शिक्षा दिली आहे. न्यायालयाने गेल्या आठवड्यात अँजेलिनाला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
सेक्स वर्कर म्हणून काम करणार्या अँजेलिना बारिनीला औषध वितरणाच्या दोन गुन्ह्यांमध्येही दोषी ठरविण्यात आले. एका प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या शेफच्या मृत्यूप्रकरणी अँजेलिना आणि तिच्या माजी प्रियकराचे नावही आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफचा मृतदेह चादरीत गुंडाळून डस्टबिनमध्ये फेकण्यात आला होता.
या प्रकरणात अँजेलिनाची मोठी बहीण सॅलीने सांगितले की, अँजेलिना तिच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा विचार करत आहे. सॅली म्हणते की अँजेलिना ड्रग्सची सवय होती, पण तिच्यासोबत रात्र घालवण्यासाठी गेलेले लोकही संत नव्हते. अँजेलिना कोणाला बळजबरीने घेऊन जात नसे, ड्रग्स घेताना लोक स्वता:च्या इच्छेने तिच्यासोबत जायचे आणि तिच्याशी संबंध बनवायचे.
सॅलीच्या म्हणण्यानुसार, अँजेलिनाने डोक्यावर बंदूक ठेवून कोणालातरी तिच्यासोबत जाण्यास भाग पाडले असे नाही. तेच लोक तिला घेऊन जायचे. आता अँजेलिनाला ३० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वातायचे असेल तर वरच्या न्यायालयात तिला जावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडमध्ये सापडलेली ‘ती’ कवटी आहे ब्रिटीशांच्या क्रुरतेची साक्षीदार, १८५७ ची भयानक घटना ऐकून हादरुन जाल
“राज ठाकरेंना तुरुंगात टाका, मगच त्यांचं डोकं शांत होईल”, असदुद्दीन ओवैसी भडकले
टिळकांनी समाधी बांधण्यासाठी पैसे गोळा केले पण समाधी बांधली नाही; आव्हाडांचा पुराव्यानिशी गंभीर आरोप