Share

bjp : ‘राज ठाकरे मुर्दाबाद’, मुरजी पटेल यांचे समर्थक संतापले; राजकीय वातावरण तापलं

raj thackeray

bjp : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपने अखेर माघारी घेतली असून निवडणूक बिनविरोधक केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील पाहायला मिळत आहे. पटेल समर्थक कार्यकर्ते पक्षावर नाराज झाले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी केली. तसंच आम्ही पक्षावर नाराज असल्याचे उघडपणे सांगितलं.

विशेष बाब म्हणजे,  ‘राज ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणांनी अंधेरी पूर्वचा परिसर दणाणून गेला होता. इतक्या दिवसांच्या प्रचारानंतर मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे, ही बाब अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. यामुळे राज्यातील राजकारण आणखीनच तापलं आहे.

भाजपच्या या निर्णयाबाबत बोलताना भाजपचे नेते मुरजी पटेल म्हणाले, की मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी अजिबातही नाराज नाही. मी पक्षाचा आदेश मान्य करतो. पक्षाने याबाबतचा निर्णय सांगताच एकाही मिनिटाचा विचार न करता अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती मुरजी पटेल यांनी दिली.

भाजप श्रेष्ठींच्या निर्णयावर संताप व्यक्त करत ‘ये जो हुआ है, वो बहुत गलत हुआ है,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. याचाच धागा पकडत मुंबईतील एक कार्यकर्त्याने भाजप श्रेष्ठीच्या निर्णयावर ‘बहुत गलत हुआ है’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

यामुळे आता पटेल काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अंधेरीची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं. मुरजी पटेल आज अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now