Share

bjp : निवडणुकीआधीच भाजपने मैदान सोडलं! अंधेरी पोटनिवडणूकीतून मुरजी पटेलांनी घेतली माघार

Murji Patel

bjp : अंधेरी पोट निवडणुकीकडे अवघ्या राज्याच लक्ष्य लागले होते. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन्हीही गट आमने-सामने आले आहेत. मात्र याच निवडणुकीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

अंधेरी पोट निवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना मैदानात उतरविण्यात आलं होतं. मात्र आता भाजप या निवडणुकीतून माघार घेणार असल्याच वृत्त समोर आलं आहे. यामुळे लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले. पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते पक्ष आदेशाचा पालन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र असं असलं तरी देखील राज ठाकरे यांनी भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती भाजपाची केली होती.

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं. अखेर अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now