प्रसिद्ध जोडप्याच्या ब्रेकअपनं बॉलिवूड हादरलं, तीन वर्षानंतर नातं संपल्यामुळे चाहतेही झाले दु:खी

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. अनन्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील तिच्या नात्यामुळेही खूप चर्चेत असते. अलीकडेच अनन्याबाबत एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये अनन्या पांडेचे ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. (ananya pandey and ishan khattar breakup)

बॉलिवूमध्ये सध्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहे. जिथे काही जोडपी आई-वडील बनून आपल्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू करत आहेत. तर काही जोडपी ब्रेकअपचा आधार घेत आपले मार्ग वेगळे करत आहेत. आता या यादीत ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचीही नावे आली आहेत.

सध्या सोशल मीडियावर ईशान खट्टर आणि अनन्या पांडेचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही समंजसपणे एकमेकांशी दूर गेले असल्याचे म्हटले जात आहे. पण या दोघांच्या ब्रेकअपमुळे दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Pinkvilla च्या बातमीनुसार, अनन्या पांडे आणि ईशान खट्टर ३ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आहे. ‘खाली पीली’च्या सेटवर दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग सुरू झाली आणि त्यातून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. मात्र, ३ वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेर त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांचेही नाते चांगले होते. तसेच दोघांमध्ये कोणतेही वाद नव्हते, पण तरीही दोघांनी ब्रेकअप केल्याचे म्हटले जात आहे. दोघे यापुढे त्यांच्या मैत्रिचे नाते चांगले ठेवणार आहे. ही बातमी अनन्या आणि ईशानच्या चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

काही काळापूर्वी अभिनेता ईशान खट्टरची आई नीलिमा अझीम ईशान आणि अनन्या पांडे यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसली होती. एका मुलाखतीत त्यांनी या दोघांबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. त्यांनी सांगितले की, अनन्या केवळ ईशानच्या आयुष्यातलाच नाही तर त्यांच्या कुटुंबाचा देखील एक महत्त्वाचा भाग आहे.

तसेच त्यांनी अनन्या पांडेच्या गेहराईयाँ या चित्रपटाचेही कौतुक केले. इतकंच नाही तर नीलिमा अझीमने हेही मान्य केले की, अनन्या पांडे शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या खूप जवळची आहे. शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही ती दिसली होती. यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: हजारो फूट उंचीवर विमानाचं इंजिन पडलं बंद; चालकाने जीव धोक्यात घालून केला असा स्टंट
रामचरणची दरियादिली! RRR चे यश पाहून झाला खुश, पुर्ण टीमला घरी बोलावून दिलं ‘हे’ महागडं गिफ्ट
टाटांचा मास्टरप्लॅन! आता सगळ्या वस्तू मिळणार एकाच ठिकाणी; रिलायन्स, प्लिपकार्ट-ऍमेझॉनला बसणार धक्का