Anand mahindra | आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. आनंद महिंद्रा देखील सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेला प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. यावेळी त्यांनी लग्नाच्या चलत्या फिरत्या हॉलचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ अतिशय अनोखा आहे. यावर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, त्यांना या फिरत्या विवाह हॉलच्या बिल्डरला भेटायचे आहे. मी तुम्हाला या व्हिडिओबद्दल सांगतो.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ एका जाहिरातीसारखा दिसत आहे. त्यात एक ट्रक दिसत आहे. ज्याच्या आत संपूर्ण विवाह मंडप बांधण्यात आला आहे. हे देखील विशेष आहे कारण या लग्नमंडपात 200 लोक आरामात येऊ शकतात.
त्यात एसी देखील आहे आणि उत्तम डेकोरेशन केलेले आहे. या व्हिडिओमध्ये एका लग्नसोहळ्याची छोटीशी झलकही दाखवण्यात आली आहे. हा विवाह मंडप गरजेनुसार कुठेही पोहोचू शकतो. ही आयडिया लहान शहरे आणि गावांसाठी चांगले आहे जेथे सुविधा नाहीत.
लग्नासाठी हा मंडप काही वेळात तयार होतो. हा मॅरेज हॉल पाहून आनंद महिंद्रा खूप प्रभावित झाले आहेत. ज्या व्यक्तीने हा मंडप बनवला आहे त्या व्यक्तीचे त्यांनी खूप कौतुक केले आहे. त्यांनी व्हिडिओबद्दल लिहिले आहे की, ज्या माणसाने ही कला साकारली आहे त्याला मला भेटायचे आहे.
ही आयडिया केवळ दुर्गम भागातच सुविधा देणार नाही, तर पर्यावरणासाठीही ही चांगली आयडिया आहे. तसेच त्याला जास्त जागाही लागत नाही. हे अगदी सोयीचे आहे. ते सहज कुठेही नेले जाऊ शकते, असं म्हणत आनंद महिंद्रानी त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.
I’d like to meet the person behind the conception and design of this product. So creative. And thoughtful. Not only provides a facility to remote areas but also is eco-friendly since it doesn’t take up permanent space in a population-dense country pic.twitter.com/dyqWaUR810
— anand mahindra (@anandmahindra) September 25, 2022
महत्वाच्या बातम्या
Deepika padukone : हृदविकाराच्या आजारामुळे दिपीकाची प्रकृती चिंताजनक; मध्यरात्री ॲडमीट, डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट
Eknath Shinde : अखेर निर्णय झाला! एकनाथ शिंदे होणार नवे शिवसेना पक्षप्रमुख
Chhagan Bhujbal : शाळांमध्ये सरस्वती ऐवजी शाहु फुले आंबेडकारांचे फोटो लावा; छगन भुजबळांची जाहीर मागणी
Election Commission : शिवसेना नेमकी कोणाची? निवडणूक आयोगाने दिलं महत्वपूर्ण स्पष्टीकरण