Share

बंडखोर एकनाथ शिंदेंना दिघे कुटुंबीयांनी सुनावले; आनंद दिघेंनी गद्दारी सहन केलीच नसती..

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते सध्या गुजरातच्या सुरतमध्ये आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (anand dighe family on eknath shinde)

एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारलाही धोका निर्माण झाला आहे. बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

एकनाथ शिंदे यांच्या या ट्विटनंतर आता आनंद दिघे यांच्या भूमिकेवर दिघे कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते शिवसेना भवनाबाहेर उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघेसाहेब असते तर असं घडलंच नसतं. शिवसेनेच्या संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकलेले आहे, अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली आहे.

तसेच गद्दारांना क्षमा नाही, असं आनंद दिघेसाहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही, तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे तिथे एखादा नेता नाही राहिला तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे विचार आहे. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.

ठाण्यात फार गलिच्छ राजकारण सुरु होतं. जिथे मला बोलवण्यात आलं तिथे मी गेलो. आनंद दिघेंचा पुतण्या असल्याने मलाही स्वाभिमान आहे. मी कुठेही लाचार नव्हतो. दरवाजा उघडणं, पाया पडणं माझ्या तत्वात बसत नव्हतं, असेही केदार दिघे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये जावे एवढी भाजपची लायकी नाही”
आमदारांना जबरदस्तीने सुरतला पळवून नेलय; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्नीची पोलिसांत तक्रार
नाराजी दूर करण्यात अपयश! एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? ठाकरे सरकार संकटात

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now