Share

भारतीय विद्यार्थीनीने सांगीतली युक्रेनमधील भयानक परिस्थीती; म्हणाली, इथे लोक वेड्यासारखी…

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या वादामुळे कित्येक नागरिक तेथील विमानतळावर तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये अडकून बसले आहेत. या युध्दाने सर्वसामांन्याचे जिवन विस्कळीत करुन टाकले आहे. यासाठी नागरिक या भागांमधून सुखरुप बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. यामध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

भारतातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यातील मुंबईच्या एका विद्यार्थींनीने काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संवाद साधला. यावेळी तीने युक्रेनमधील परिस्थितीवर भाष्य करत तेथील चिंताजनक स्थिती पटोलेंना सांगितली. यानंतर पटोले यांनी या संवादाचा व्हिडीओ ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची विनंती केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये नाना पटोले यांनी म्हटले आहे की, “युक्रेनमधील संकटात अडकलेल्या मुंबईतील चैताली नावाच्या विद्यार्थिनीशी आज मी संवाद साधला. युद्धामुळे तेथील परिस्थिती फार चिंताजनक झालीय. तेथे अडकलेले भारतीय विद्यार्थी भारत सरकारच्या मदतीची अपेक्षा करतायत. निवडणूक प्रचार थांबवून लवकरात लवकर आपल्या देशातील मुलांना मायदेशी घेऊन या मोदीजी,”

युक्रेनमधील स्थितीवर भाष्य करताना नाना पटोले यांनी विद्यार्थींनीला विचारले की, तु तिथे कशी पोहचली, त्यावर तीने सांगितले की, मी इथे प्राण्यांच्या डॉक्टरीचं शिक्षण घेतेय. यासाठीच येथे आले होते. परंतु आता या युध्दाच्या स्थितीत अडकले आहे. नाना पटोलेंशी संवाद साधलेल्या विद्यार्थींनीचे नाव चैत्राली आहे.

तेथील स्थितीची माहिती देत तिने म्हणले आहे की, “सामान संपत चाललंय. इथं लोक वेड्यासारखं सामान खरेदी करतायत. अगदी लुटल्यासारखं करत आहेत. दुकानातलं जेवण, पाणी, एटीमएमधली कॅश सगळं संपत चाललंय. नोटबंदीनंतर कशा रांगा लागलेल्या एटीएमसमोर तशा रांगा लागल्यात,”

त्याचबरोबर, सध्या पोलीस फिरतायत गाड्या घेऊन. इथले लोक सकाळी सहा-साडेसहापासून घाबरलेल्या अवस्थेत आहेत. एटीएममधले पैसे संपलेत. पाण्याच्या बाटल्या विकल्या जात आहेत. पण इथे सार्वजनिक ठिकाणी पैसे देऊन पाणी भरण्यासाठी फिल्टरही असतात. त्या फिल्टरमधील पाणीही संपलंय,” अशी माहिती चैत्रालीने दिली आहे.

नाना पटोले यांनी विद्यार्थींनीला आश्वासन दिले आहे की, आम्ही तुम्हाला सुखरुप मायदेशी परत आणू. दरम्यान युक्रेन आणि राशियामध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांची सुखरुप सुटका करण्यासाठी केंद्र सरकार पुर्ण प्रयत्न करत आहे. नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकार रशिया आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांशी संवाद साधण्याचे प्रयत्न करत आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारण

Join WhatsApp

Join Now