गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपांचा जणू काही जंगी आखाडाच रंगला आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली.
अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील शिवसेनेला लक्ष केले आहे. राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हापासून सातत्याने अमृता फडणवीस या सेनेवर टीका करत आहे.
आताही अमृता फडणवीस यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत शाब्दिक हल्ला चढवला आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये थोडक्यात उत्तर द्यावे; असं लिहीत वसूली, लोडशेडींग, ट्राफिक वरुन सरकारवर निशाणा साधला आहे.
तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रश्न विचारत काही पर्यात दिले आहेत. सध्या राजकीय वर्तुळात अमृता फडणवीस यांच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, अमृता फडणवीसांकडून करण्यात आल्याने शिवसेना त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्याच शक्यता आहे. त्यांच्या या ट्विटने आता नवीन वाद वाढणार एवढं मात्र नक्की झालं आहे.
वाचा काय आहे अमृता फडणवीस यांचे ट्विट.. “उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? बायकोच्या भावाच्या ताब्यात?” असा ट्विटवरून सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ट्विट करत ऑप्शनची यादीही सादर केली आहे. त्यांनी ट्वट करत लिहले आहे की, थोडक्यात उत्तर धावे; (उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किव्हा सर्व पर्याय निवडून धावे).
एक पर्याय लिहायला विसरलेच ;
६. बायकोच्या भावाच्या ताब्यात …#Maharashtra #Maharashtraunderattack https://t.co/yDKp6taewo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 24, 2022
पुढे ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे. उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ? 1 वसूली च्या ताब्यात, 2 विकृत अघाडीच्या ताब्यात, 3 लोड shedding च्या ताब्यात, 4 Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात, 5 गुंडांच्या ताब्यात, 6. बायकोच्या भावाच्या ताब्यात …? असे पर्याय देत अमृता यांनी सेनेवर टिका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
चिन्मय मांडलेकरने प्रेक्षकांना केली कळकळीची विनंती; म्हणाला, चित्रपट पाहत असताना चित्रपटाचा शेवट..
तुरुंगात जाताच नवनीत राणांची तब्येत खालावली; ब्लड प्रेशर प्रचंड वाढल्याने रुग्णालयात उपचार सुरू
VIDEO : आईचे आणि भावाचे फोटो काढणाऱ्यावर भडकला तैमुर; म्हणाला, ‘बंद करो दादा, बंद करो’
मंगेशकर कुटुंबीयांची ‘ही’ भूमिका अगम्य, हा १२ कोटी मराठी माणसांचा अपमान; आव्हाड भडकले