amruta fadnavis : महाराष्ट्रातून मोठं – मोठे प्रकल्प सध्या गुजरतला नेण्यात येतं आहेत. अशातच सध्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प चर्चेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. सध्या या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
विरोधक भाजप – शिंदे गटावर आरोप करत आहेत. तर सत्ताधारी देखील विरोधकांवर निशाणा साधत आहेत. या आरोप – प्रत्यारोपांच्या सत्रात आता आणखी एका व्यक्तीने उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. यामुळे अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याने आणखी एका नवीन वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हंटलं आहे की, महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गेल्याचे दुःख आहे. मात्र त्यांच्याशी संबंधित काही लघु प्रकल्प मेक इन इंडियाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत, याचा आनंद असल्याचं अमृता यांनी म्हंटलं आहे.’
मात्र, असं असलं तरी देखील महाविकास आघाडी सरकारमुळेचे वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प झाला नाही, असा गंभीर आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. या वक्तव्याने पुन्हा एकदा अमृता फडणवीस या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन या प्रकल्प चांगलाच चर्चेत आला आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता राजकारण चांगलचं तापलं आहे. अलीकडेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला. यामुळे आता हे प्रकरण आणखीच चिघळलं आहे.
महत्वाच्या बातम्या
Shinde Group : शिंदे गटातील मंत्री भुमरेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ; ८९० कोटींच्या योजनेचे कंत्राट जावयाला
Shivsena : शिंदेंनी शिवसेना फोडली, आता शिवसेनेने काॅंग्रेसला पाडले खिंडार; बड्या नेत्याचा सेनेत प्रवेश
Salman khan : सलमानला मारण्यासाठी बनवला होता प्लॅन-बी, फार्म हाऊसच्या मार्गावर भाड्याने घेतली होती रूम, पण…
या धडाकेबाज क्रिकेटरने थेट चीअरलीडरशीच केले लग्न, IPL च्या मैदानाच सुरू झाली लव्हस्टोरी