माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर अनेकदा अमृता फडणवीस अॅक्टिव दिसतात. त्या नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. या फोटोमधून कधी त्या राजकीय विषयावर भाष्य करताना दिसतात. (amruta fadanvis posted on social media about her new song)
तर कधी सामाजिक विषयावर बोट ठेवतात. सामाजिक विषयांवर त्यांनी अनेकदा गाण्याच्या माध्यामातून किंवा ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात. अशातच अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
आज व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. तसेच ट्विटसोबत अमृता यांनी एक खास फोटोही शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. आपल्याला कल्पना आहेच की, अमृता फडणवीस या गाण्यावर आणि संगितावर प्रेम करतात.
अर्थात त्यांनी व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी त्यांच्या आगमी गाण्याची घोषणा केली आहे. अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होत असल्याची घोषणा करताना स्वत:चा एक फोटोही पोस्ट केला आहे. लॉर्ड शिवा म्हणजे महादेवाच्या भक्तीवर आधारित हे गाणं असल्याचं त्यांच्या ट्विट वरुन वाटत आहे.
विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांचा लुकही त्याच पद्धतीचा दिसून येतो. भगव्या वस्त्रामध्ये गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेल्या आणि हाती त्रिशूल धरलेल्या अमृता फडणवीस दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,”मी तुझी निवड आता कायमस्वरुपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात आणि श्वासातही आहेस.
हा फोटो शेअर करत त्यांनी, “मी आता आणि यापुढे कायमच तुला निवडलं आहे. तू माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात आहेत. ज्या दिवशी आपल्या प्रिय लोकांबद्दल प्रेम व्यक्त करायचं असतं त्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त मी माझ्याकडून संगीतमय कौतुक करणार आहे माझ्या रुद्रचं,” अशी कॅप्शन दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सात वाहन एकमेकांना धडकली; चार जणांचा जागीच मृत्यू, वाचा अपघाताचा थरार
अजब डिमांड! 82 वर्षाच्या आजीची ‘ही’ इच्छा ऐकून कुटूंबियांना बसला धक्का..
‘नुकसान झालं तरी चालेल’, म्हणत साध्या देशी सायकलमध्ये पैसै गुंतवण्यास आनंद महिंद्रा तयार
‘व्हॅलेंटाईन-डे’च्या निमित्ताने मलायका आणि अर्जूनने एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर; सोशल मीडियावर व्हायरल