Share

वेश्यांचा आदर करा, देहविक्री व्यवसायाला कायदेशीर मान्यता आणि सन्मान द्या; अमृता फडणवीसांची मागणी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. अनेकदा ते त्यांच्या वक्तव्यांमुळे वादातही अडकत असतात. अशात त्यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी वेश्या व्यवसायाबाबत वक्तव्य केले आहे. (amruta fadanvis on prostitutio)

भारतात देखील वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून मान्यता देण्याची मागणी अमृता फडणवीसांनी केली आहे. तसेच इतर व्यवसायांप्रमाणे या व्यवसायालाही सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे.

अमृता फडणवीस शनिवारी पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्या बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी देहविक्री करणाऱ्या महिलाही त्यांच्यासमोर होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

मी सरकारला असंच सांगेन की जसं इतर व्यवसायांना सन्मान दिला जातो. तसाच सन्मान देहविक्री व्यवसायाला देखील मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्वीकारलं पाहिजे. जर्मनीमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचा आदर केला जातो, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच ज्याठिकाणी देहविक्रीला मान्यता आहे. तिथे व्यवसाय करणारे कर देखील भरतात. तिच गोष्ट आपण भारतात लागू केली, आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील वेश्या व्यवसायाला मान्यता मिळू शकतो. मी या निर्णयावर ठाम आहे, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

सगळ्यांनी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्या. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्या व्यवसायात आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्ही वेळेत तपासणी करत जा. काळजी करु नका, तुमच्या मागे भारतीय जनता पक्ष उभा आहे, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच अभिनेत्री नयनताराला आली कायदेशीर नोटीस; काय गुन्हा केला तिने? वाचा…
असा डेटिंग शो पाहिला नसेल! बोलायचं नाही, पण जंगलात राहून आवडीच्या मुलीसोबत संबंध बनवू शकतात
ज्याप्रमाणे जर्मनीत झालं, तसंच भारतात वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या- अमृता फडणवीस

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now