amruta fadanvis new song | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्या त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळेही चर्चेत येत असतात. त्या एक गायिका असल्यामुळे त्या नवनवीन अल्बम तयार करत असतात. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीसांचं एक गाणं आलं आहे.
आज मैंने मूड बना लिया हैं ए ए, तेरे नाल नचना वे, असे त्या गाण्याचे नाव आहे. हे गाणं आजच रिलिज झालं आहे. बऱ्याच दिवसांपासून या गाण्याची चर्चा होत होती. अखेर ते संपुर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सोशल मीडियावरही हे गाणं व्हायरल होत आहे.
या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा आला असून तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस या खुप ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येत आहे. बॅचलर पार्टीवर हे गाणं आधारित आहे. या गाण्यात अमृता फडणवीस या डान्सही करताना दिसून येत आहे.
या गाण्यामध्ये अमृता फडणवीसांचे वेगवेगळे ग्लॅमसर लूक पाहायला मिळत आहे. हे गाणे टी सिरिजच्या बॅनर खाली बनवण्यात आले आहे. टी सिरिजवर याचा ५ जानेवारीला टिझरही प्रदर्शित झाला होता. टीझर रिलिज झाल्यापासून अमृता फडणवीसांचे चाहते खुप खुश झाले होते.
कित्येक महिन्यानंतर अमृता फडणवीसांचे गाणे येत असल्यामुळे चाहते या गाण्याची खुप आतुरतेने वाट पाहत होते. अमृता फडणवीसांनी सुद्धा तीन दिवसांपूर्वी गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. अखेर ते गाणे आता रिलिज झाले आहे.
अमृता फडणवीस या सहसा आपल्या गाण्यांमध्ये डान्स करताना दिसून येत नाही. पण या गाण्यामध्ये त्या डान्स करताना दिसून आल्या आहे. टी सिरिजने हे गाणं रिलिज केलं असून आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी या गाण्याला बघितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
sanjay raut : …तर नारायण राणे ५० वर्षांसाठी तुरूंगात जाणार
आधी त्याच्यासोबत केला डान्स अन् मग स्टेजवरच केले किस; गौतमी पाटीलचा व्हिडीओ आला समोर
Pandharpur : विठूरायाला भाविकांनी अर्पण केले पोतंभर खोटे दागिने, पण हे दागिने आले कुठून?