जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्टवर गोळीबार केला आहे. यामध्ये तिची हत्या झाली आहे. ती तिच्या पुतण्यासोबत घराबाहेर उभी होती, त्याचवेळी तिच्यावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि तिची हत्या केली. (amrin bhatt death after terror attack)
मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे ही घटना घडली आहे. अमरीन भट्टची दहशतवाद्यांनी तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबारात तिचा पुतण्याही गंभीर जखमी झाला आहे. पुतण्याला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, ही घटना तीन दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमरीन भट्ट (२९) रात्री ८ वाजता पुतण्या फुरहान झुबेरसोबत चदूरा भागातील तिच्या घराबाहेर उभी होती. यादरम्यान तेथे पोहोचलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळ्या लागताच अमरीन आणि तिचा पुतण्या रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले.
दहशतवादी निघून जाताच नातेवाईक आणि इतर लोकांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात नेले. जेथे डॉक्टरांनी अमरीनला मृत घोषित केले. तर तिच्या पुतण्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी सखोल कारवाई सुरू करण्यात आली. मात्र हल्लेखोरांचा काहीही पत्ता लागलेला नाही.
अमरीन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होती. देशात टिकटॉकवर बंदी येण्यापूर्वी ती या प्लॅटफॉर्मवरील तिच्या व्हिडिओंसाठी खूप प्रसिद्ध होती. तिची फॅन फॉलोविंग सुद्धा प्रचंड होती. गोळीबारात झालेल्या तिच्या मृत्युमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
एका पायावर लंगडत शाळेत जाणाऱ्या अपंग मुलीच्या मदतीला धावून आला सोनू सूद; म्हणाला…
“सगळी प्रॉपर्टी विकली तरी या सायकलची सर येणार नाही”, वडिलांच्या आठवणीत वसंत मोरे भावुक