Share

“एकादशीला पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले”

uddhav thackeray

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सध्या शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. तसेच त्यांच्यासोबत अनेक मंत्रीही जात आहे. (amol mitkari viral tweet)

एकनाथ शिंदे यांचा गट हा मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच सत्ताधारी नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी दिली आहे. सर्वोच्च न्यालयाच्या सुनावणीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

अखेर पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले. याचा अर्थ मविआचे मुख्यमंत्री महापुजा करतील तोवर बंडखोरांनी गुवाहाटीत थांबण्यास हरकत नाही. “एकादशी” तिकडे आणि द्वादशी हिकडे, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ११ जूलैला होणार आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर आज सुनावणी देताना न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1541364418113548288

सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जूलै रोजी होणार आहे. तसेच आमदारांनी १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या-
मालेगावच्या नदीतून वाहताना दिसले रक्तमिश्रित पाणी, लोकांनी सांगितले धक्कादायक कारण
आजोबा झाल्यानंतर करण जोहर झाला भलताच खुश, म्हणाला, माझी बेबी आलिया भट्ट…
बॉलिवूडचा ‘हा’ ऍक्शन हिरो आहे शाहरूख खानची प्रेरणा, म्हणाला, ‘मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now