Share

मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने फडणवीस नाराज, शिंदेंच्या हाताखाली काम करण्याची त्यांची इच्छा नाही

आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा दिवस आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याची घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांनीच ही शाळा केली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसात सरकार पडलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सत्तास्थापनेचा दावा केला.

देवेंद्र फडणवीसांनीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिली. फडणवीसांच्या या खेळीला मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हणलं जात आहे. सोशल मिडीयावर यावरून चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं आहे जे चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, हा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे षडयंत्र? असा तिखट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी एकामागून एक ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे षडयंत्र? हे येणारा काळच ठरवेल.

https://twitter.com/amolmitkari22/status/1542479638244761600?s=20&t=dVaI82AlfKzzkTC_-z7XQQ

त्यांनी पुढं असंही ट्विट केलं की, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कारकिर्द कदाचित 30 जून 2022 ते 1 जुलै 2022. देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक. असं ट्विट करत त्यांनी नवीन मुख्यमंत्र्यांच्या पदाचा कार्यकाळाचा अंदाज बांधला आहे. त्यानंतर त्यांनी असंही ट्विट केलं होतं की, अवघ्या काही मिनिटातच महाराष्ट्राच्या जनते समोर कोण मुख्यमंत्री व कोण उपमुख्यमंत्री याबाबत स्पष्टीकरण येईल.

https://twitter.com/amolmitkari22/status/1542504051732262912?s=20&t=dVaI82AlfKzzkTC_-z7XQQ

मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज झालेले आहेत. शिवाय एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताखाली काम करायला त्यांची इच्छा नाही अशीही एक चर्चा आहे, अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या
नॅशनल भालाफेक खेळाडूचे फुफ्फुसं झालेत निकामी, उपचारासाठी दरमहा ‘एवढा’ खर्च, पैशांची टंचाई
औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे का बदलली? काय आहे या नावांमागचा इतिहास?
जॅकलीन फर्नांडिसच्या डुप्लिकेटने दिली टॉपलेस पोज, सोशल मिडीयाचे वाढले तापमान, चाहते अवाक
कुठेही जा सोडणार नाही, कारवाईच्या भितीने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना नव्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now