Share

अमोल मिटकरींनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार; म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी…

राज्यात सध्या नवीन सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. त्यानंतर सरकार वेगवेगळे निर्णय घेताना दिसून येत आहे. पण त्यांच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेते टीका करताना दिसून येत आहे. (amol mitkari thank to cm eknath shinde)

आता अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री यांना पीए म्हणून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

आता पत्रकार परिषदेत दोन माईक घेतले आहे. मुख्यमंत्रिपदाचा आदर केला त्याबद्दल आनंदच आहे. पण एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांनाच पीए म्हणून ठेवलं आहे. याबद्दल मी त्यांचे खरोखरच आभार मानतो, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला होता. फडणवीसांच्या या कृतीनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यावेळी अमोल मिटकरी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला होता.

मागच्या काळ्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना बोलायचे नसल्यास ते अजित पवारांना माईक द्यायचे. त्यानंतर अजित पवार प्रास्ताविक करायचे. तेव्हा उद्धव ठाकरे हे स्वत:हून अजित पवारांना माईक द्यायचे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.

तसेच ते पुढे म्हणाले होते की, देवेंद्र फडणीसांनी परवा एक चिठ्ठी एकनाथ शिंदे यांना दिली. कोल्हापूरमध्ये शिंदेंनी त्यांच्या गटातील आमदारांचे नावं घेतली होती, पण ते भाजपचे महाडिकांचे नाव घेणे विसरले होते. त्यामुळे फडणवीसांनी त्यांना चिठ्ठीत ते नाव लिहून दिले. आधी माईक खेचला नंतर चिठ्ठी दिली. उद्या काय काय खेचतील माहित नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
कचऱ्याच्या गाडीत सापडले पंतप्रधान मोदी आणि योगींचे फोटो, सफाई कर्मचाऱ्याने गमावली नोकरी
चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका उल्लूची ‘ही’ बोल्ड वेब सिरिज, नाहीतर घरच्यांसमोरच उडेल तारांबळ
झुकेगा नहीं साला! ‘पुष्पा २’ साठी अल्लू अर्जूनने घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी मानधन; वाचून डोळे पांढरे होतील

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now