Share

भाजपचा फार मोठा विजय नाही, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या.., अमोल मिटकरींचा भाजपवर हल्लाबोल

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडलं. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले.

शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संजय पवार यांना दारूण पराभव झाला. ते शिवसेनेचे उमेदवार होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांनी झेंडा रोवला. दुसरीकडे भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले.

त्यामध्ये पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. भाजपमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. या जल्लोषाच्या वातावरणात या सगळ्याचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिले जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भाजपवर आरोप करण्यास सुरूवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, अखेर रडीचा डाव यशस्वी झाला. अपक्षातील काही मतदातांवर यंत्रणा, धाकटपट शाहिने कपटी राजकारण करण्यात भाजप यशस्वी झाली असली तरीही त्यांनी एक लक्षात ठेवावे, मविआची मतं सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही.

तुमच्या केंद्रिय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, असा आरोप अमोल मिटकरींनी लावला आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. पुढे ते म्हणाले की, शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त पसंतीची मते आहेत. त्यामुळे भाजपचा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

ते असंही म्हणाले की, काही अपक्षाच्या जोरावर दगा फटका करणारी ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार, अशा शब्दांत त्यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. दरम्यान, संजय राऊतांनीही भाजपवर आरोप करत अनेक आमदारांवर शिवसेनेला दगा दिल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांमुळे राजकारण तापलेले आहे.

महत्वाच्या बातम्या
..आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून शिकण्यासारखं आहे, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
“… त्याच्या बुडावर लाथ मारून हाकालपट्टी केली आहे”, संजय राऊतांवर राजू शेट्टी भडकले
‘शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’, मनसेचा खोचक टोला
महाडिकांच्या विजयाचे श्रेय फडणवीसांना देताना चंद्रकांत पाटलांना भावना अनावर, म्हणाले, मुंगी होऊन..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now