शिनसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीने याच मुद्याला धरून भाजपला लक्ष केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
‘शिंदेसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांसोबत काहीतरी चुकीचे घडत आहे. त्यांच्या जेवणातून त्यांना गुंगीचे औषध दिले जातं आहे. तसेच, एकनाथ शिंदे हे भाजप विरोधी आहेत. मात्र आज ते भाजपची प्रशंसा करत आहेत, नक्कीचं त्यांना भाजपकडून काहीतरी ट्रीट केलं जात असल्याच मिटकरी यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना मिटकरी म्हणाले, ‘सेनेला खरंच चॅलेंज करायचं होतं तर तुमचं बलस्थान असलेल्या ठाणे, पालघर या भागातून तुम्ही आव्हान दिलं पाहिजे होतं. तुम्ही सूरतला गेलात, सूरत महाराष्ट्रापासून जवळ, आमदार कधीही पळून जातील. म्हणून तिथून तुम्ही पोहोचलात गुवाहाटीमध्ये.’
मिटकरी यांच्या आरोपांवर अद्याप भाजपची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र मिटकरी यांनी केलेल्या आरोपांमुळे नक्कीच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मिटकरी यांनी केलेल्या आरोपांवर आता भाजप काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये असे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदे गटाला मोठा धक्का, आमदार परतीच्या वाटेवर; शिवसैनिकांना शांत राहण्याचे केले आवाहन
अखेर ठरलं! एकनाथ शिंदे आपल्या गटाला देणार ‘हे’ अनोखं नाव, नाव वाचून उद्धव ठाकरेही टेंशनमध्ये जातील
मला माझ्या कष्टाचे पैसै दिले नाहीत, तारक मेहता शोच्या मेकर्सवर मुख्य कलाकाराचे गंभीर आरोप
“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”, बंडखोर शिवसेना आमदारची ऑडिओ क्लिप व्हायरल