सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ यांच्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘द काश्मीर फाइल्स’वरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे हा चित्रपट खरोखरच उत्तम असून मागील ३२ वर्षांपासून खदखदत असणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या वेदना उत्तमपणे मोठ्या पडद्यावर साकारल्याचं कौतुक केलं जातं आहे.
तर दुसरीकडे निवडणुकीच्या मुद्द्यावर हा चित्रपट बनवण्यात आल्याची टीका भाजपवर करण्यात येत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन सुरु असलेले वादविवाद थांबायला तयार नाही. राज्याच्या राजकीय वर्तुळात देखाल ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
अशातच राष्ट्रवादीने पुन्हा भाजपला लक्ष केले आहे. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने एका वृत्तवाहिनीमधील चर्चासत्रातील किस्सा सांगत भाजपला लक्ष केले आहे. आमदार अमोल मिटकरी याबाबत पत्रकारांशी बोलत होते. तसेच मिटकरी यांनी बोलताना ‘झुंड’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ची तुलना केली.
यावेळी बोलताना त्यांनी एका चर्चासत्रादरम्यान घडलेला प्रसंगही सांगितला. परवा एक भाजपाचे आमदार माझ्यासोबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्रामध्ये सोबत होते, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्ही झुंड टॅक्स फ्री करु शकता कश्मीर फाइल्स का नाही? असा प्रश्न केला.
याचाच अर्थ भाजपाच्या मनामध्ये झुंड चित्रपटाबद्दल जो आकस आहे, द्वेष आहे त्याचा पाठपुरावा केला, असे मिटकरी यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना भाजपला लक्ष करताना ते म्हणाले, ‘अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपाच्या लोकांना खटकलंय का?, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, “भाजपाला झुंडचा इतका तिरस्कार का आणि कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का? असाही सवाल त्यांनी केला. तसेच “मी तर म्हणतो आगामी काळात पिक्चर सुपर डुपर हिट करायचा असेल तर गुजरात फाइल्स नावाचा चित्रपट काढला गेला पाहिजे,” असा खोचक टोलाही मिटकरींनी हाणला.
महत्त्वाच्या बातम्या
फॅंड्री, सैराट, झुंड या तिन्ही सिनेमात समान सुत्र; बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरुन नागराज…
शेवटच्या श्वासापर्यंत नेहरू-गांधी परिवाराची गुलामगिरी करत राहणार कारण.., आमदाराच्या वक्तव्याने विधानसभेत गोंधळ
काश्मिर फाईल्स चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या होत्या लता मंगेशकर, दिले होते वचन
आता MIM ला विरोध करणाऱ्या शिवसेनेने महापौरपदासाठी केली होती मुस्लिम लीगशी युती