सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचे बिल न भरल्यामुळे हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला होता. गुरुवारी हा सर्व प्रकार घडला असून राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. संबंधित घटना ही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे घडली आहे. या घटनेनंतर आता राजकीय नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. (amol mitkari criticize sadabhau khot)
सांगोला येथील एका हॉटेलमध्ये सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांनी पार्टी केली होती. त्यानंतर बिल न देता ते तसेच निघून जात होते. त्यामुळे हॉटेल मालकाने त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. तसेच त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडे चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तव आंदोलन करा . आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
https://twitter.com/amolmitkari22/status/1537701883191640064
अमोल मिटकरी यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांनाही टॅग केले आहे. तसेच या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. आता सदाभाऊ खोत याला काय उत्तर देणार आहे याकडे सर्वांचे लागले आहे.
दरम्यान, हॉटेल मालकाने केलेल्या गंभीर आरोपांवर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत यांनी हॉटेल मालकाचे सर्व आरोप फेटाळले आहे. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच घडला असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले आहे.
सदाभाऊ खोतांनी आरोप फेटाळल्यानंतर आता हॉटेल मालकाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. माझा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे सदाभाऊ यांनी तातडीने माझी उधारी द्यावी. तसेच उधारी दिल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही, असेही हॉटेल मालकाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; राष्ट्रवादीचा सदाभाऊंना खोचक टोला
VIDEO: काश्मीरमधील तो कॅफे ज्याला इंडियन आर्मी चालवते, स्वतः आनंद महिंद्रांनी दिलेत 10 स्टार, म्हणाले..
महाविकास आघाडीला ‘महा’झटका : अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही