महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याचे वातावरण अजूनही तापलेले आहे. (amol mitkari criticize raj thackeray)
मशिदींवरील भोंगे काढा नाहीतर लाऊडस्पीकरवर हनूमान चालिसा वाजवू असे राज ठाकरेंनी म्हटले होते. तसेच उत्तर सभेत बोलतानाही त्यांनी आपण भोंग्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्यावर सत्ताधारी नेते टीका करताना दिसून येत आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावलंय? तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा पाठ नाही. तुम्हालाही दोन ओळी म्हणता आल्या नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावलं आहे. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा पाठ नाही. आम्ही हनुमान चालिसा लहानपणापासून पाळण्यात शिकलेली हिंदू माणसं आहोत. तुलसीदासांनी इतकी सुंदर हनुमान चालिसा लिहिली आहे. रामचरितमानसवर उर्दु शब्दांचाही प्रभाव आहे. हे तुम्ही कबुल करा. मुस्लिमांचा विरोध करु नका, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे हे दंगली भडकवण्याचे काम करत आहे. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालिसाच्या दोन ओळीही तुम्हाला म्हणता येत नाही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
दोन वर्षांपासून राज्यामध्ये आर्थिक संकट आहे. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू असेल, सर्वसामान्य मुस्लिम असेल त्यांचे रोजंदारीचे उदरनिर्वाहाचे प्रश्न आहे.भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रशासनाने चार-चार वर्षे फाईली दाबून ठेवल्या नसत्या तर कोळशाचा तुटवडा नसता पडला, गडकरी स्पष्टच बोलले
“सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्याला ११ लाख अन् जी महिला कामगार त्यांच्या हातात बांगड्या भरेल तिला ५ लाख”
महेशबाबूने खरेदी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची ऑडीची इलेक्ट्रिक कार; फोटो शेअर करत म्हणाला,..