पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या दौऱ्यापेक्षा त्यांच्या दौऱ्यात होणाऱ्या प्रचारांमुळे चर्चेत येत असतात. लवकरच मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहे. मोदी पुण्याला येणार म्हणून त्यांच्या स्वागताची तयारीही जोरदार सुरु आहे. पण त्यांच्या एका बॅनेरमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. (amol mitkari criticize narendra modi)
पंतप्रधान मोदींचा लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे वाद निर्माण झाला आहे. बॅनरमध्ये दिसत असलेल्या त्यांच्या फोटोंमुळे हा वारकरी संप्रयादायाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही वक्तव्य केले आहे.
बॅनरवर पंढरपूरच्या पांडुरंगांपेक्षा नरेंद्र मोदींचा फोटो मोठा झालाय, यावरुन अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. अकोल्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं आहे. मोदी पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही, असे वक्तव्य अमोल मिटकरींनी यावेळी केले आहे.
भारतीय जनता पार्टीने आज नाटक सुरु केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो जगदगुरु संत तुकोबाराया यांच्या वेशात दाखवण्यात आला आहे. त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान झालाय, असे मिटकरींनी म्हटले आहे. तसेच दुसरीकडे ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी वर्चस्व दिले. त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान केलीये. भाजपकडून वारंवार अशा गोष्टींनी समाजात तेढ निर्माण केला जात आहे, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
तसेच हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चितच मोठे आहे पण ते पांडूरंगापेक्षा मोठे असू शकत नाही. हा माझा वारकरी म्हणून विश्वास आहे. त्यामुळे यामागील मेंदू शोधणे खुप गरजेचे आहे, असे अमोल मिटकरी यांनी कार्यक्रमात म्हटले आहे.
मी अशा कृत्यांचा निषेध करतो. यासर्व प्रकरणी मोदींनी आणि त्यांच्या पक्षातील लोकांनी वारकरी संप्रदायाची माफी मागायला हवी. कारण त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. इथला वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीच सहन करणार नाही, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘अशा भांडखोर बायका आम्हाला ७ जन्म तर काय पण ७ सेकंदही नको’; पुरूषांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारून साजरी केली वटपोर्णिमा
पैगंबरांच्या नावाखाली हिंसाचार होऊ देणार नाही; मुस्लिम संघटनेची फतवा काढण्याची घोषणा
धनंजय महाडिकांना डबल लॉटरी; खासदारकीनंतर केंद्रीय मंत्रीपदीही संधी मिळणार?