Share

”दोन आठवडे झाले राज्याला कृषीमंत्री नाही, पेट्रोलचे दर कमी करुन काही उपकार केले नाही”

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. पेट्रोलच्या दरात ५ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (amol mitkari criticize eknath shinde government)

महागाईमुळे नागरिक त्रस्त होते, पण सरकारच्या या निर्णयामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी करण्याबाबत आधीच सांगितले होते. आता या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

हा निर्णय घेतल्यानंतर राजकीय नेतेही यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पेट्रोलचे दर कमी करुन सरकारने फार उपकार केले नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने घेतलेला निर्णय हा अपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यांनी हा निर्णय घेऊन फार उपकार केलेले नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यामुळे त्यांच्या आताच्या वक्तव्यामुळेही ते चर्चेत आले आहे.

या सरकारला दोन आठवडे झाले, तरी अजून राज्याला कृषीमंत्री मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा लुळ्या पांगळ्या सरकारनं एक निर्णय घेतला म्हणजे उपकार केले नाही, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

तसेच हे सरकार खुनशी सरकार आहे. साम दाम दंड भेदवापरुन अनैसर्गिकरित्या हे सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे हे सरकार कधीपर्यंत टीकेल हे माहित नाही. पण मध्यावधी निवडणूक लावल्यास जनता बंडखोरांना जागा दाखवून देईल, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून आमदारांना पैशांचं आमिष, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
धक्कादायक! पिटबुल कुत्र्याने मालकीणीचे तोडले लचके, ८० वर्षीय सुशीला यांचा उपचारादरम्यान मृत्यु
तुम्हीही वापरताय Hey WhatsApp? चुकूनही वापरू नका नाहीतर पडेल महागात, कंपनीने दिला इशारा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now