राज्यात बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. तसेच त्याचे रोमांचकारी व्हिडिओही समोर येत आहे. (amol kolhe share diksha video)
अशात अनेक राजकीय नेते बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहे. तसेच विजेत्यांना चांगले बक्षीसही देत आहे. बैलगाडा शर्यत ही खुपच जिकरीची असते कारण बैलाला सांभाळणं हे सोपं काम नसतं. पण शेतकरीही काही कमी नसतो हे तो दाखवून देत असतो. ही शर्यत पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत असते.
असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक मुलगी त्या बैलांना सांभाळताना दिसून येत आहे. बैल आक्रमक असले तरी मुलगी त्या बैलांना जुंपत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
https://twitter.com/kolhe_amol/status/1504767888749907969
आता अमोल कोल्हेंनी हा व्हिडिओ शेअर करत त्या मुलीच्या हिंमतीची दाद दिली आहे. तसेच मुलीचे कौतूक करत शाबास गं रणरागिणी असे म्हणत तिच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या शेतकऱ्याच्या मुलीचे कौतूक केले आहे.
व्हिडिओमध्ये दिसून येणाऱ्या मुलीचे नाव दिक्षा विकास पारवे असे आहे. ती व्हिडिओमध्ये बैल जुंपताना दिसत आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत म्हटले की, शाब्बास गं रणरागिणी! शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत! जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते.
तसेच पुढे म्हणाले, आपल्या जुन्नर तालुक्याची कन्या कु. दिक्षा विकास पारवे हिने बैलगाडा जुंपण्याची हिंमत दाखवली! दिक्षा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करून दाखवलंय. तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ कारणामुळे अभिनेते राजकुमार यांच्यावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते
‘मला पकडून दाखवाच’ MBA पदवीधर चोरट्याचं पोलिसांना खुलं आव्हान
आयुष्यच बेरंग झालं; रंगपंचमीच्या दिवशी आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी