Share

‘झुंड’ची स्टोरी पाहून एका झटक्यात बिग बींनी कमी केली आपली फी; म्हणाले, माझ्यावर खर्च करण्यापेक्षा..

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी काही खुलासे केले आणि सांगितले की, अमिताभ बच्चन यांनी चित्रपटासाठी फी कमी केली होती आणि ते पैसे चित्रपटात गुंतवण्यास सांगितले होते.

फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या भूमिकेसाठी मी फक्त अमिताभ बच्चन यांचा विचार केला होता. या भूमिकेसाठी फक्त बिग बीच योग्य आहेत, असे मला वाटले. पण या चित्रपटाचे बजेट कमी होते. फार मोठे बजेट नव्हते. त्यामुळे मला चिंता वाटत होती, पण त्यांनी आम्हाला होकार दिला, असे संदीप सिंग यांनी म्हटले आहे.

बिग बी हे फुटबॉलचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली. त्यानंतर त्यांनी चित्रपटाची फी कमी करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर त्यांच्या कर्मचार्‍यांनी त्यांची फी देखील कमी केली, जेणेकरून ते पैसे वाचू शकतील. चित्रपटावर खर्च करा, त्यामुळे चित्रपट अधिक चांगला होऊ शकेल, असे आम्हाला अमिताभ बच्चन यांनीच सांगितले होते, असे संदीप सिंग यांनी म्हटले आहे.

अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी फी कमी केल्यानंतरही चित्रपटाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे संदीपने उघड केले. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी २०१८ मध्ये पुण्यात चित्रपटाचा सेट बांधला होता, पण पैशांच्या कमतरतेमुळे तो बंद करावा लागला होता. त्यानंतर वर्षभरासाठी या चित्रपटाची निर्मिती थांबवण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा टी-सीरीजने या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा त्यांनी या चित्रपटाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला, असे संदीप सिंग यांनी म्हटले आहे.

आम्ही संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण नागपुरात केले आहे. मी टी-सिरीजचे अध्यक्ष भूषण कुमार यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि चित्रपटात पैसे गुंतवले. चित्रपटात ज्या मुलांचे चित्रण करण्यात आले आहे, त्यांना आम्ही नागपूरमधूनच घेतले आहे. त्या मुलांना नागराज मंजुळे यांनी झोपडपट्टीतल्या मुलांमधूनच निवडले आहे, असेही संदीप म्हणाले आहे.

दरम्यान, ‘झुंड’ ४ मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केले असून विजय बारसे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. हा मंजुळेंचा पहिला बॉलिवूड चित्रपट असेल. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात बिग बी फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-
भारतावर खुश असलेला रशिया आता भारतीय मिडीयावर झाला नाराज, दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना
दारूच्या नशेत असतानाचा विनोद कांबळीचा व्हिडीओ झाला व्हायरल, इमारतीच्या गेटवर धडकवली गाडी
राग, जिद्द आणि चिकाटी असलेले अशनीर ग्रोव्हर यांची त्यांच्याच कंपनीने केली हकालपट्टी; कारण वाचून हादराल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now