Share

amit shaha : अन् त्याक्षणी अमित शाहांनी ठरवलं की मविआ सरकार खाली खेचायचं; वाचा सत्तांतराची Inside Story

amit shaha uddhav thackeray sharad pawar

amit shaha see mahavikas aghadi poster | काही महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि सरकार पडले. कारण त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले होते. त्यानंतर जुन महिन्यात भाजप-शिंदेंचे सरकार आले.

भाजप-शिंदे  गटाचे सरकार हे खुपच अनपेक्षित होते, असे वाटत असले तरी त्यामागे अप्रत्यक्षपणे भाजपचाच हात होता. त्यामागेही किस्सा आहे. तो म्हणजे भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांनी मुंबईत एक पोस्टर बघितले होते. तिथूनच त्यांनी महाराष्ट्रात आपले सरकार आणण्याचा विचार सुरु केला होता.

२०१९ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार होणार होते. पण मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली होती. पण शिंदेंची बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांना धक्का देणारी होती.

भाजप-शिंदे सरकार काही महिन्यांपूर्वी बनलं असलं तरी त्याची सुरुवात २०१९ मध्येच झाली होती. नवी मुंबईत स्वामी नारायण पंथाचा एक कार्यक्रम होता. तिथे गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यावेळी कार्यक्रमाला जात असताना त्यांनी रस्त्यावर एक मोठं महाविकास आघाडीचं पोस्टर बघितलं होतं.

अमित शाह यांच्यासोबत त्यावेळी आशिष शेलारही होते. त्या पोस्टरवर शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींचा फोटो होता. ते पाहून अमित शाह म्हणाले की, ये कैसा है अचंबा है की अपने से बडा स्टेट छीन लिया. तिथून पुढे गेल्यानंतर त्यांना आणखी एक पोस्टर दिसले.

त्या पोस्टरवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधींचा फोटो होता. त्यावेळी अमित शाह म्हणाले की, अपने को इसका कुछ करना पडेगा. त्यावेळी शेलार म्हणाले की, हा अमित भाई कुछ तो करना पडेगा.  त्यानंतर अमित शाह म्हणाले की, भावनामें प्रतिक्रिया दी जाती है, लेकीन काम करना है तो ठंडे दिमाग से करना होगा. त्यानंतर तब्बल अडीच वर्षानंतर राज्यात भाजपचं सरकार आलं. त्यामुळे भाजपच्या या सरकारमध्ये अमित शाहांनी महत्वाची भूमिका निभावल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
nanded : ट्रक पेट्रोल पंपावर थांबवला अन् महिलेचं नशीबच पलटलं, एका झटक्यात झाली ८ कोटींची मालकीण
शाहरूखचा मुलगा आयर्नने पटलली बाॅलीवूडमधील सर्वात बोल्ड आयटम गर्ल; दोघांचे ‘ते’ फोटो झाले लीक
७६ वर्षीय अभिनेते कबीर बेदींनी २९ वर्षांनी लहान मुलीशी केले लग्न; पत्नीला पाहून लोक झाली थक्क

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now