Share

भगवान शंकराप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विष प्राषण केलंय; अमित शहा असं का म्हणाले? जाणून घ्या..

गुजरात दंगलीशी संबंधित झाकिया जाफरी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट मिळाली आहे. सध्या देशभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. असे असताना आता गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे. तसेच त्यांनी यावेळी एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे. (amit shaha on narendra modi)

अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी विशेष संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान शंकरासारखे विष प्राषण केले आहे. १९ वर्षांपासून गुजरात दंगलीवर काहीही न बोलता ते अनेक गोष्टी सहन करत आहे.

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी १९ वर्षे काहीही न बोलता सहन केले. तसेच पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत अमित शहा म्हणाले की, एक शब्दही न उच्चारता देशाचा एवढा मोठा नेता भगवान शंकराप्रमाणे विष प्राषण करुन सर्व दु:खांशी लढत राहिला आहे.

अमित शहा म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना या वेदनांचा सामना करताना खूप जवळून पाहिले आहे. त्यांना अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. सत्य समोर असूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती त्यामुळे आम्ही शांत होतो. तसेच न्याय प्रक्रियेवर कुठलाही परीणाम होऊ नये त्यामुळेही आम्ही शांत होतो.

अमित शाह म्हणाले की, १९ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काही लोकांनी राजकीय हेतूने हे आरोप केले आहेत, असे न्यायालयाचे निरीक्षण आहे. यामागे काही निहित स्वार्थ होते. याशिवाय या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षावर जो डाग पडला होता तोही धुऊन निघाला आहे.

तसेच अमित शहा असेही म्हणाले की, पंतप्रधान मोदींसारख्या जागतिक नेत्यावर चुकीचे आरोप केले गेले. माझा विश्वास आहे की लोकशाहीमध्ये संविधानाचा आदर केला जातो. पंतप्रधान मोदीजींनी राजकारणात काम करणाऱ्या सर्व लोकांसमोर एक आदर्श उभा केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे ‘संकटमोचक’; बंडखोरांना परत आणायचा ‘असा’ आखला प्लॅन
एकनाथ शिंदे आपल्या गटाला देणार ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे’ हे नाव, उद्धव ठाकरेंना धक्का
मला माझ्या कष्टाचे पैसै दिले नाहीत, तारक मेहता शोच्या मेकर्सवर मुख्य कलाकाराचे गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now